जिल्ह्यात १७ गावांसह २५ वाड्याना १३ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात १७ गावांसह २५ वाड्याना १३ टँकरने पाणीपुरवठा

नाशिक । Nashik

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाच्या झळा तीव्र होत आहे. ग्र‍मीण भागात पाणी टंचाईलाही सुरुवात झाली ‍असुन जिल्ह्यात १७ गावे आणि २५ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे सर्व टँकर येवला तालुक्यात सुरु असून इतर त‍ालुक्यांचे प्रस्तावही टंचाइ शाखेकडे प्राप्त होण्याची शक्यता आहे.

गत वर्षी समाधान कारक पाऊस झाला त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली. धरणेही ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात सुरु होणारी पाणी टंचाई यंदा फारशी जाणवली नव्हती. पण आता उन्हाच्या झळा तीव्र होत असून एप्रिलच्या पंधरवडयानंतर पाणी टंचाई जाणवायला लागली आहे.

जलाशयांमधील पाणीसाठा कमी कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही आटत आहेत. पुरेसे पाणी नसल्याने लागलीच पर्यायी व्यवस्थेची मागणी होत आहे. त्यानुसार शासनाकडून नुकतेच खासगी टँकर्स पुरवठादाराचीही नियुक्ती झाल्याने टँकरचा पुरवठा केला जात आहे. येवल्यात मागील आठवड्यात पाच गावांसाठी ३ शासकीय टँकरचा पुर‌वठा सुरु करण्यात आला होता.

आता आठवडाभरातच याच येवल्या तालुक्यातून १२ गावे आणि २५ वाड्यांकडून पाणी टँकरची मागणी तहसीलदारांनी केली. त्यानुसार त्याचा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला. परंतू आता करोना संकटात प्रांताधिकाऱ्यांनाच टँकरचे मंजूरीचे अधिकार वितरीत करण्यात आले.

त्यानुसार पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येवल्याच्या प्रांताधिकाऱ्यांनाच टँकर सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले. लागलीच सोमवारी येवला उपविभागीय अधिकाऱ्यांनी या १२ गावे अन् २५ वाड्यांसाठी १० टँकर मंजूर केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com