सातपुर विभागात ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद

सातपुर विभागात ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद

नाशिक |प्रतिनिधी | Nashik

सातपुर विभागातील (satpur division) प्रभाग क्रमांक ८ मधील डावा तट कालवा, आनंदी आंगण जॉगिंग ट्रॅक (jogging track), पाईप लाईन रोड येथे पीएससी ग्रॅव्हिटी मेन पाईपलाईनला पाणी गळती सुरू आहे.

या पाईपलाईनद्वारे सातपुर (satpur) प्रभाग ८ व नाशिक पश्चिम मधील प्रभाग ७ रामराज्य, नहुष जलकुंभ भरून वितरण क्षेत्रात पाणीपुरवठा (Water supply) करण्यात येतो. नाशिक पश्चिम विभागातील जी.पी.ओ. जलकुंभ, बुधवार पेठ जलकुंभ व सादिकशहा जलकुंभ भरणाऱ्या लाईनवर ४५० मीमी व्यासाचा व्हाॅल्व बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या जलकुंभावरुन नाशिक पश्चिम प्र.क्र . १३ व प्र. क्र. १४ मध्ये पाणीपुरवठा होते. सदरील ठिकाणी बुधवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळचा पाणीपुरवठा (Water supply) झाल्यानंतर पाईपलाईन गळती दुरुस्ती करणे व व्हाॅल्व बसविण्याचे काम करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.

त्यासाठी शटडाऊन आवश्यक असल्याने, प्र. क्र. १३, प्र.क्र.१४ व प्र.क्र. ८ रामराज्य जलकुंभ- सावरकर नगर, राम नगर, नरसिंह नगर, मते नर्सरी रोड, दाते नगर आसाराम बापू पूल परिसर व इत्यादी परिसर, प्र.क्र.७ नहुष जलकुंभ छुडी के नगर सहदेव नगर आयाचीत नगर, सुयोजित गार्डन, गंगा सागर कॉलनी, पंपिंग स्टेशन परिसर,

चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिक नगर, शांतिनिकेतन कॉलनी १२ पंपिंग स्टेशन, चैतन्य नगर इत्यादी परिसर, सिद्धिविनायक कॉलनी भद्रकाली, सोमवार पेठ, चव्हाटा, बुधवार पेठ, बडी दर्गा परीसर, कुंभार वाडा जुने नाशिक परीसर, सारडा सर्कल परीसर, अमरधाम रोड परिसरात बुधवार दि २५ जानेवारी रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com