पाणी पुरवठा
पाणी पुरवठा
नाशिक

मुंबई नाका परिसरात पाणी पुरवठा बंद

पूर्व सूचना नसल्याने नागरिक संतप्त

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | Nashik

कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मुंबईनाका परिसरात आज पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले, पूर्व सूचना मिळाल्याने लोक नियोजन करून पाणी साठवून ठेवतात मात्र तसे न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नळांना पाणी कधी येणार याबाबतही काहीच माहिती मिळत नसल्याने महिला वर्गात चिंता वाढली आहे. सध्या करोनाचे वातावरण असल्यामुळे घरांमध्ये पाण्याचा वापर वाढला आहे, मात्र अशा वातावरणात देखील पाणी पुरवठा खंडित झाल्याने महापालिका प्रशासनावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई नाका परिसरात सकाळी दोन वेळेस पाणी येते. मात्र मागील काही महिन्यांपासून सायंकाळी पाणीपुरवठा होत नाही तरी नागरिक सकाळीच पाणी भरून ठेवतात. अशावेळी पाणी न आल्यामुळे आता काय करायचं हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. महापालिकेचे टँकर देखील करोनामुळे व्यस्त असल्याने तेही येत नाही. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com