बरसणाऱ्या जलधारांमध्येही पाण्यासाठी दाही दिशा

पाईपलाईन फुटल्याने अनेक भागात पाणीपुरवठा खंडित
बरसणाऱ्या जलधारांमध्येही पाण्यासाठी दाही दिशा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात शनिवारी फुटलेली पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीचे काम रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरु होते.

दरम्यान लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र यामुळे सातपूर परिसरात पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. वरून वरून राजा बसत असतानाही नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत होते

शिवाजीनगर ते अंबड पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात फुटली. यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. पपया नर्सरी चौकात पाण्याचे तळे साचले होते.

तातडीची उपाययोजना म्हणून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे महात्मानगर, गुरुकुल, विकास कॉलनी, तिडके कॉलनी आदींसह विविध भागांचा रविवारी व सोमवारी पाणीपुरवठा खंडित होता.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारी पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केले होते. रात्री उशिरापर्यंत काम सुरु होते.

पाणीपुरवठा उपअभियंता रवींद्र पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी दिवसभर घटनास्थळी उपस्थित होते. १९९५ साली १२०० मिलिमीटर व्यासाची सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली होती. वाढती लोकसंख्या व पाण्याचा वापर लक्षात घेत जुनी पाईपलाईन बदलून नवीन मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकावी अशी मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी केली आहे.

पपया नर्सरी चौकातील पाइपलाइन फुटल्याने अनेक भागात पाणीपुरवठा खंडित झाला आहे. सिमेंटची अतिशय जुनी पाइपलाइन असल्याने दुरुस्तीसाठी वेळ लागतो. रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरु आहे. कितीही वेळ लागला तरी युद्धपातळीवर काम करून आज पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न राहील.

पपया नर्सरी चौकातील पाईपलाईनफुटल्याने अनेक भागात पाणीपुरवठा खंडित झाला आहे. सिमेंटची अतिशय जुनी पाइपलाइन असल्याने दुरुस्तीसाठी वेळ लागतो. रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरु आहे. कितीही वेळ लागला तरी युद्धपातळीवर काम करून सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न राहील. - रवींद्र पाटील, (उपअभियंता पाणीपुरवठा विभाग.)

- रवींद्र पाटील, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com