शनिवारी नाशकात पाणी पुरवठा बंद

शनिवारी नाशकात पाणी पुरवठा बंद
पाणी पुरवठा

नाशिक | Nashik

मनपाचे गंगापुर धरण रा.वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील अ)132 के.व्ही. सातपुर ब)132 के.व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे व मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.

या केंद्रांवरील महावितरणकडुन ओव्हरहेड लाईनची पावसाळापुर्व कामे करणे करीता (दि.२२) रोजी सकाळी ९: ३० ते सायंकाळी ६ वाजेपावेतो वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या दोन्ही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी (दि.२२) रोजी बंद ठेवून उपरोक्त नमुद कामे करता येणे शक्य होणार आहे.

तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच (दि.२३) रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com