मनमाडमध्ये 15 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडीत

नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे मनमाडकर संतप्त
मनमाडमध्ये 15 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडीत

मनमाड । बब्बू शेख Manmad

वागदर्डी धरण तुडूंब भरलेले असतांना देखील मनमाड नगर परिषदेच्या (Manmad Municipal Council) ढिसाळ व अनियंत्रित कारभारामुळे (Uncontrolled management) पंधरा दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर देखील पाणी पुरवठा होवू शकला नाही.

यामुळे शहरातील सव्वालाख नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला (water scarcity) सामोरे जावे लागत असून बोरवेलचे शारयुक्त पाणी पिण्याची वेळ आल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका (Health hazards) निर्माण झाला आहे. दरम्यान, पाणीपुरवठा (Water supply) होत नसल्याबद्दल पालिका प्रशासनातर्फे धरणावरील पंपिग मोटारी जळाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्या ऐवजी मुख्याधिकारी सुट्टीवर गेले तर छोट्या-छोट्या गोष्ठीसाठी रस्त्यावर उतरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष (Political party) आणि सामजिक संघटना पाणी टंचाई बाबत मात्र मौन बाळगून आहेत. पालिका प्रशासनाला कोणीही जाब विचारत नसल्याचे असल्याचे पाहून या शहराला खरच कोणी वाली आहे कि नाही? असा प्रश्न संतप्त नागरीकांतर्फे केला जात आहे.

शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), काँग्रेस (Congress) आणि आरपीआय (RPI) या चार पक्षांची सत्ता पालिकेवर असून त्यांनी किमान ट्रॅक्टरने तरी पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करायला हवी होती मात्र सर्व गट नेते आणि पाणी पुरवठा सभापती यांनी देखील जनतेला वारेवर सोडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. रेल्वेचे जंक्शन (Railway junction), धान्य साठवणूक डेपो, रेल्वेचे साहित्य तयार करणारा ब्रिटीश कालीन कारखाना,

इंधन प्रकल्प (Fuel project) आदीमुळे देशाच्या नकाशावर मनमाड शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र एक हंडा पाण्यासाठी होणारी अबालवृदांची धडपड असे विदारक चित्र गेल्या 30 ते 35 वर्षापासून येथे पहावयास मिळत आहे मात्र सलग दोन वर्षा पासून या भागात दमदार पाऊस (heavy rain) होत असल्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही वागदर्डी धरण पूर्ण भरून ओवर फ्लो झाले आहे

त्यामुळे नियमितपणे पाणी मिळेल असे नागरिकांना वाटत असताना धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत झाली आहे.गेल्या 15 ते 17 दिवसा पासून शहरात पाणी पुरवठा झाला नाही त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ नागरिकावर आली आहे. दरम्यान धरणाच्या पंपिंग स्टेशन वरील असलेल्या तीन मोटारी पैकी 2 जळाल्या असल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला

असल्याचे पालिका प्रशासनाने तर्फे सांगण्यात आले मात्र पहिली मोटार जळाल्यानंतर तिला दुरुस्तीसाठी टाकण्यात आली होती ती दुरुस्त होऊन देखील आणण्यात आली नाही तिकडे दुसरी मोटार जळाली हा सर्व प्रकार पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणाचा आहे. प्रशासनाच्या या चुकीमुळे आमच्यावर बोरवेलचे शार युक्त दुषित पाणी पिण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया मनमाडवासियांतर्फे व्यक्त केली जात आहे.

वर्‍हाडींची पाण्यासाठी दमछाक

करोना आटोक्यात आल्यामुळे तुळशी विवाह पार पडताच लग्न सोहळ्यांची धामधूम सुरु झाली आहे. शहरात रोज मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे पार पडत असून त्यासाठी पाहुणे मंडळीची गर्दी होऊ लागली आहे. या लग्न सोहळ्यांना देखील पाणीटंचाईचा फटका जाणवत आहे. वर्‍हाडींना अंघोळीसाठी तर सोडाच त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न मनमाडवासिय यजमानांना पडला आहे. वधुपित्याच्या आर्थिक विवंचनेमुळे काही ठिकाणी तर बोअरवेलचे शारयुक्त पाणी पिण्याची वेळ वर्‍हाडींवर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com