मालेगावात आज पाणीपुरवठा खंडित

जेसीबीने मुख्य जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
मालेगावात आज पाणीपुरवठा खंडित

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

येथील नवीन बसस्थानकाजवळ (Bus stop) उड्डाणपुलाचे (flyover) खोदकाम सुरू असतांना शहरास पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या पीएफसी जलवाहिनीस जेसीबीचा (JCB) तडाखा बसल्याने ती फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. मुख्य जलवाहिनीस लिकेज झाल्याने संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जुना आग्रारोडवर सिमेंट रस्त्याचे काम (Cement road work) सुरू असतांना तेरा दिवसांपुर्वी जलवाहिनी फुटली होती. आज मध्यरात्री जेसीबीच्या तडाख्यानेच जलवाहिनी फुटण्याचा दुसरा प्रकार घडल्याने सदर कामातील निष्काळजीपणा पुन्हा उघडकीस आला आहे. दरम्यान, जलवाहिनी दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर पाणीपुरवठा विभागातर्फे हाती घेण्यात आले असून उद्या दि. 30 डिसेंबररोजी होणारा पाणीपुरवठा 24 तास विलंबाने होण्याची शक्यता असल्याने शहरवासियांनी तांत्रिक अडचण लक्षात घेत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

येथील जुना आग्रारोडवर आर.डी. ऑईल मिल (R.D. Oil mill) ते सखावत हॉटेलपर्यंत उड्डाण पुलाचे तसेच सिमेंट काँक्रीटीकरण (Cement concreting) रस्त्याचे काम (Road work) मनपातर्फे हाती घेण्यात आले आहे. आज मध्यरात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास उड्डाण पुलाचे काम जेसीबीच्या माध्यमातून सुरू असतांना जमीनीखालील असलेल्या पीएफसी मुख्य जलवाहिनीस जेसीबीचा तडाखा बसल्याने ती फुटून पाण्याचे फवारे उडण्यास प्रारंभ झाला. सहाशे मि.मी. दोन फूटाची ही जलवाहिनी असल्याने मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहू लागले.

या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे (Water Supply Department) उपअभियंता जयपाल त्रिभुवन (Deputy Engineer Jaipal Tribhuvan), प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मुख्य जलवाहिनीतूनच लिकेज झाले असल्याचे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे निदर्शनास येत असल्याने धरणातून जलवाहिनीत होणारा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याच्या सुचना उपअभियंता त्रिभुवन यांनी संबंधित कर्मचार्‍यांना केल्या. यानंतर आज दुपारपर्यंत या जलवाहिनीतील पाणी संपुर्णपणे बाहेर काढण्याचे काम मनपा पथकातर्फे केले जात होते.

पाणी उपसण्यासाठी दोन वीजपंप या ठिकाणी लावण्यात आले होते. जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मोठा खड्डा झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे जलवाहिनी कुठे लिकेज झाली हे निष्पन्न होत नव्हते. दुपारनंतर पाण्याचा उपसा झाल्यावर सदर लिकेज पथकाच्या निदर्शनास आल्याने त्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू असतांना दुसर्‍यांदा जलवाहिनी फुटल्याने आयुक्त भालचंद्र गोसावी, शहर अभियंता कैलास बच्छाव या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. उड्डाण पुल तसेच सिमेंट रस्त्याचे काम करणार्‍या संबंधितांना यावेळी खबरदारी घेण्याबाबत आयुक्तांतर्फे सुचना देण्यात आल्या. मुख्य जलवाहिनीच लिकेज झाली असल्याने दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा उद्या 24 तास विलंबाने होणार आहे.

Related Stories

No stories found.