शहरात टँकरने पाणीपुरवठा सुरु

तक्रारीनंतर मनपा प्रशासनाचे पाऊल
शहरात टँकरने पाणीपुरवठा सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एप्रिल महिना कडाक्याच्या उन्हाचा तडाखा ( Heat Waves ) संपल्यानंतर आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. यामुळे नाशिक शहरात पाण्याच्या मागणीत वाढ झाली असली तरी काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातील सहा विभागात एकूण 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा ( Water Supply By Water Tankers )केला जात आहे.

मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लवकरच पाण्यासंदर्भात आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर नाशिक मनपा पाण्याच्या उचल क्षमतेत वाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या नाशिक मनपा सुमारे 542 दशलक्ष घनफूट पाणी उचलत असल्याचे समजते. हे पाणी शहराला काही प्रमाणात कमी पडत आहे. त्यामुळे पाण्याची उचल करण्यात मनपा लवकरच वाढ करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, शहरातील सर्व सहा विभागात एक याप्रमाणे सहा टँकर सुरू होते. मात्र गेल्या दोन दिवसांत नाशिकरोड, पंचवटी, नवीन नाशिक तसेच पश्चिम विभागात एक अतिरिक्त पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टँकरची संख्या 10 झाली आहे. नागरिकांची आणखी मागणी आल्यावर त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे.

Related Stories

No stories found.