जिल्ह्यात टँकरचे अर्धशतक

७१ गावांसह ४५ वाड्यांना पाणी पुरवठा
जिल्ह्यात टँकरचे अर्धशतक

नाशिक । Nashik

मे महिनाच्या अखेरीस जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा घसा कोरडा होत असून टॅकरच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२ टॅकरद्वारे ७१ गावे व ४५ वाड्यातील तहान भागवली जात आहे. सर्वाधिक टॅकर हे येवला तालुक्यात सुरु अाहे. या ठिकाणी १८ टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास जिल्ह्याचा घसा आणखी कोरडा होण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने धरणे अोव्हर फ्लो झाली होती. नदी व नाले तुडूंब भरुन वाहत होते. भूजल पातळीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा फारशी पाणीबाणी जाणवली नाही.

यंदा देखील मे महिनाच्या प्रारंभी पर्यंत ग्रामीण जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र तापमानाचा पारा जसाजसा वाढत आहे तशी पाण्याची टंचाई ग्रामीण भागात जाणवू लागली आहे. नदी व नाले अटले असून विहिरिंनी तळ गाठला आहे. त्यामुळे टॅकरच्या मागणीत वाढ होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२ टॅकर सुरु आहेत.

सन २०१८ मध्ये हे प्रमाण चारशे टॅकरच्या घरात होते. तर मागील वर्षी या कालावधीत टॅकरची संख्या पन्नासच्या आसपास होती. दुष्काळी तालुके अशी अोळख असलेल्या येवला, बागलाण यांसह अतिवृष्टीसाठी अोळखले जाणारा पेठ तालुक्यातही पाणी टंचाइ जाणवू लागली आहे.

सात शासकिय व ४५ खासगी टॅकरने गाव,वाडया व वस्तींवर पाणि पोहचवले जात आहे. रोज टॅकरच्या १२२ फेर्‍या होत असून ९६ हजार ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. त्यासाठी ५४ विहिर देखील अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

अद्याप नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी व कळवण हे तालुके टॅकरमुक्त आहेत. मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र मान्सूनला उशीर झाल्यास जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू शकते. परिणामी टॅकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com