सिन्नरकरांना मिळणार दररोज पाणी

सिन्नरकरांना मिळणार दररोज पाणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

कडवाच्या(kadva water supply scheme ) चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील सर्व अडथळे दूर झाले असून सिन्नरकरांना आता दररोज मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली.

सिन्नर शहरवासीयांचा पाणी हा जिव्हाळाचा विषय होता. 8 जून 2021 रोजी जनसेवक राजाभाऊ वाजे, गटनेते हेमंत वाजे, प्रमोद चोथवे, गोविंद लोखंडे, विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कडवा योजनेवरील दोन्ही पंप एकाच वेळी चालू करून चाचणी घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, शैलेश नाईक, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

8 जूनच्या अगोदर शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी देण्यात आले. 8 जूननंतर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे ( water supply ) नियोजन करण्यात आले. यात नागरिकांकडून आलेल्या सूचनांनुसार बदल करण्यात आले. 25 जूनपासून शहरवासीयांना दररोज 40 मिनिटे पाणी देण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले. यासाठी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कडवावरील दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने दर सेकंदला 225 लिटर तर ताशी 8.15 लाख लिटर पाणी उपलब्ध होईल.

सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत 85 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र शहरला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व पाण्याच्या टाक्यांची क्षमता ही फक्त 55 लाख लिटर असल्याने 1 पंप बंद ठेवावा लागणार असल्याचे नगराध्यक्ष डगळे यांनी स्पष्ट केले. कडवा योजनेतील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर आता शहरवासीयांना दररोज मुबलक पाणी देणार असल्याचे नगराध्यक्ष डगळे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात विरोधी गटाच्या आजी-माजी नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना पत्र व्यवहार करून कडवा योजना अपूर्ण असताना ठेकेदारास कामाची उर्वरित रक्कम देणे, पाणीपुरवठा योजना हस्तांतरण करणे तसेच योजना पूर्णत्वाचा दाखला देणे याबाबत दैनिकांमध्ये बातम्या देण्यात आल्या आहेत.

असे असले तरी आमच्या एकाही नगरसेवकाने मुख्याधिकार्‍यांना ठेकेदाराला अनामत रक्कम द्यावी, पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत करावी, योजना पूर्णत्वाचा दाखला द्यावा, अशी सूचना केलेली नाही. ती 23 जून रोजी सहसचिव, नगरविकास विभाग यांनी पत्राद्वारे मुख्याधिकार्‍यांना आदेश दिला आहे. असे असतानाही विरोधकांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मागण्या पडताळूनच पाणी योजना हस्तांतरणाचा विचार केला जाईल.

किरण डगळे, नगराध्यक्ष kiran Dagle- Sinnar Town Council

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com