
दे. कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp
येथील कॅन्टोन्मेंट परिसरात (Cantonment Area) लॅमरोडसह सर्वच रस्त्यांची पावसामुळे (monsoon) वाताहत झाली असून ऊन पडल्यानंतर रस्त्यांवरुन प्रवास करताना नागरिकांना धुळीचा (dust) सामना करावा लागत आहे.
याबाबत दै. देशदूतने (deshdoot) प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने तात्पुरती मलम पट्टी करताना पाणी मारून धूळ (dust) हटविण्याचा प्रयत्न केला. कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून (Cantonment Administration) रस्त्यावर पाण्याच्या टँकरच्या (Water tanker) माध्यमातून पाणी मारण्याची कृती केली जात आहे.
रस्त्यावर पाणी मारून काही प्रमाणात धुळीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न असून दिवाळीनंतर (diwali) सिमेंट प्लांट (Cement plant) चालू झाल्यावर खड्डे (potholes) बुजवण्याचे काम केले जाणार आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पडलेल्या उन्हामुळे रस्त्यावरील चिखलाचे रूपांतर पुन्हा होताना मोठ्या प्रमाणावर धूलिकण तयार होत आहे.
परिणामी रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना या धूलिकणांचा त्रास होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाकडून धूळ उठू नये म्हणून टँकरने पाणी मारण्यात येत आहे. मात्र थोड्याच वेळात सततची वर्दळ व उन्हाने त्या पाण्याचे बाष्पीभवन तात्काळ होत असल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही.
त्याऐवजी नाशिक रस्त्यावर नियमित झाडू मारला जावा जेणेकडून माती रस्त्याचा कडेला न थांबता ती उचलण्यात येईल. या उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र त्याप्रमाणे काम केले जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.