नाशिकमध्ये जलक्रीडा, पर्यटनाला उभारी देणार

नाशिकमध्ये जलक्रीडा, पर्यटनाला उभारी देणार

क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिकच्या जल क्रीडा व पर्यटनाला उभारी देणारा हा प्रकल्प असून सुरेख मांडणीतून तो साकारलेला आहे. येणार्‍या काळात नाशिकमध्ये रोइंगसह विविध वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन गती देणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा मंत्री सुनील सुनील केदार ( Sports Minister Sunil Sunil Kedar) यांनी गंगापूर धरणावर ( Gangapur Dam )भेटीप्रसंगी व्यक्त केले.

गंगापूर धरणालगत उभारण्यात आलेल्या वॉटर स्पोर्ट्स प्रकल्पाला केदार यांनी भेट देऊन येथील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 50 हजार पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली. करोनामुळे वॉटर स्पोर्ट्स बंद करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी मुंबई, गुजरात, सापुतारा, पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

गेल्या काही वर्षात राज्य सरकारकडून पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. जलसंधारण विभागाची जागा व पाणी या आधारावर या क्रीडा होत असल्याने पवई तलाव, तारकर्ली, गणपतीपुळे व नाशिक या ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. येणार्‍या काळात भंडारदारा, कोयना व विदर्भातील विविध स्थानावर असेच प्रकल्प सुरू करण्याचा मानस असून यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

नाशिक प्रकल्पाची कौतुक करताना केदार यांनी पायाभूत सुविधांचे सुरेख मांडणी केल्याबद्दल कौतुक केले. त्यासोबतच स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार दिल्याने समाधान व्यक्त केले. असाच प्रकल्प नागपूरमध्ये उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com