शासकीय वसाहतीत पाणीटंचाईची समस्या

शासकीय वसाहतीत पाणीटंचाईची समस्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चांडक सर्कल (Chandak Circle) येथील शासकीय कर्मचारी वसाहतीत रहिवाशांना (Residents) गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आज (सोमवारी) याठिकाणच्या रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा (Agitation) इशारा दिला आहे...

चांडक सर्कल येथे असलेल्या दगडी इमारतीमध्ये विविध शासकीय विभागांतील कर्मचार्‍यांची (Government Departments Employees) वसाहत आहे. या ठिकाणी विजय वसाहत, लोकमान्य टिळक वसाहत, लालबहादूर शास्त्री वसाहत इत्यादी शासकीय कर्मचार्‍यांच्या वसाहती आहेत. या ठिकाणी डागडुजी व सर्व सुविधा पुरवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून येथील कर्मचार्‍यांच्या पगारातून मेंटेनन्सच्या नावाने दरमहा ठराविक रक्कम देखील वजा होते. सदरहू परिसरात गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून पाणीटंचाईची समस्या (Water Shortage Problem) निर्माण झाली आहे.

प्रशासनातर्फे या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र या ठिकाणी किमान १० ते १२ ट्रँकर्सची आवश्यकता असून केवळ तीन ते चार टँकरने पाणीपुरवठा (Water Supply) होत आहे. या वसाहतीच्या शेजारीच शासकीय विश्रामगृह असून त्या ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा असतो. या ठिकाणी होणार्‍या पाणीटंचाईच्या विरोधात सोमवारी (दि.१३) वसाहतीतील महिला व मुलांसह अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com