
दिंडोरी | Dindori
पश्चिम घाट माथ्यावर असलेल्या पाण्याच्या अभ्यासानिमित्त आलेल्या जयंत पाटील यांनी वळणयोजनेच्या कामांना गती देण्याबरोबरच कार्यकर्त्यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.
आगामी काळात कादवा चेअमरन श्रीराम शेटे, विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार यांनी पाण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याचे या दौर्यावरुन दिसुन येत आहे.
दिंडोरी तालूक्यात गेल्या अनेक वर्षांपासुन श्रीराम शेटे यांनी माजंरपाडा प्रकल्पाचा प्रश्न उचलला होता. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघासाठी मांजरपाडा प्रकल्पाला चांगला निधी उपलब्ध करुन दिला.
आ.पवार यांनीही पाण्याबाबत सुरगाणा तालूक्याची ओरड ओळखुन प्रलंबित पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आ.झिरवाळ यांनीही वळणयोजनांची माहिती जलसंपदा मंत्र्याच्या कानी घातली.
याच पार्श्वभुमीवर ना.जयंत पाटील यांनी दौरा केला. पश्चिम घाटमाथ्यावरील वळणयोजना ना.पाटील यांनी पाहिल्या. दिंडोरी येथील श्री र्ईशान्येश्वर विदयानिकेतन , ज्युपिटर इंग्लिश स्कुलच्या धामण नदी सवर्धन प्रकल्प अहवालाचे प्रकाशन ना.पाटील यांनी केले. सुरगाणा व दिंडोरी तालूक्यातील पाणीसाठयाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी रस्त्यावरील अनेक गावांना भेटी पाणी समस्या जाणून घेतली.
आता या दौर्याचे फलित वळणयोजनांची आणि जलसिंचन प्रकल्पांची परिणिती पुर्णत्वाकडे गेल्यानंतरच होणार आहे. पण जर सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालूक्यांतील रखडलेले प्रकल्प पुर्ण झाले तर पश्चिम वाहिनीने समुद्राला जाणारे पाणी गोदावरी खोर्यात वळणार आहे, त्याचा फायदा महाराष्ट्रालाच होणार आहे, पण याचा पाठपुरावा नाही केला तर जनतेचे हाल मात्र कायम रहाणार आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांकडून सुरगाण्यातील जनतेचे पिण्याच्या पाण्याचे हाल थांबणे आवश्यक वाटते.