नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा

३४ गावे, १४ वाडयांना २४ टॅकरद्वारे पाणीपुरवठा
नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा

नाशिक । प्रतिनिधी

उन्हाच्या झळा तीव्र होताच ग्रामीण भागात पाणी टंचाईलाही सुरुवात झाली सद्यस्थितीत जिल्ह्यात २४ टॅकर सुरु आहेत. सर्वाधिक टंचाई ही येवला तालुक्यात असून या सर्वाधिक १३ टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ३४ गावे व १४ वाडयांची टॅकरद्वारे तहान भागविली जात आहेत...

मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तुलनेने कमी आहे. नेहमीचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होते. टॅकरद्वारे ग्रामीण भागातील वस्त्या व वाडयांमध्ये पाणी पुरवठ्याला सुरुवात होते.

यंदा एप्रिल अखेर उजाडला तरी फक्त टॅकरची मागणी कमी आहे. पण हळूहळू तापमानाचा पारा चढत असून उन्हाच्या झळा तीव्र होत आहे. जलाशयांमधील पाणीसाठा कमी कमी होत आहे.

नद्या, नाले आटले असून पिण्याच्या पाण्याचे इतर स्त्रोतही अाटत आहेत. पुरेसे पाणी नसल्याने लागलीच पर्यायी व्यवस्थेची मागणी होत आहे. त्यानुसार शासनाकडून नुकतेच खासगी टँकर्स पुरवठादाराचीही नियुक्ती झाल्याने टँकरचा पुरवठा केला जात आहे.

सर्वाधिक पाणी टंचाईची झळ ही येवला तालुक्याला बसत आहे. या ठिकाणी २० गावे व ११ वाडयांना १३ टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. त्या खालोखाल अतिवृष्टी अशी अोळख असलेल्या पेठ तालुक्यात सहा टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. करोना संकटात प्रांताधिकाऱ्यांनाच टँकरचे मंजूरीचे अधिकार वितरीत करण्यात आले.

टॅकरच्या संख्येत घट

दोन वर्षापुर्वी जिल्ह्यात टॅकरची संख्या ४०० च्या घरात पोहचली होती. मात्र, सन २०१९ व सन २०२० मध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे यंदा टॅकरच्या संख्येत मोठी घट पहायला मिळत आहे. यंदा मे महिना उजडला तरी जिल्ह्यात फक्त २४ टॅकर सुरु आहे.


टॅकर परिस्थिती

देवळा - १

मालेगाव - २

नांदगाव - १

पेठ - ६

येवला - १३

एकूण - २४

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com