लासलगावला पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई

लासलगावला पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई

लासलगाव । वार्ताहर

लासलगाव सह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सततच्या पाईपलाईन फुटणे, वीजपुरवठा खंडित होणे, पाणीपुरवठा मोटार नादुरुस्त होणे यामुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी साठा असूनही लासलगावला दहा ते पंधरा दिवसापासून अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून डोकेदुखी ठरू पाहणार्‍या या योजनेच्या कार्य क्षेत्रातील नागरिक पूर्ण पणे वैतागले आहे, या सततच्या पाईपलाईन लिकेजमुळे पाणीपुरवठा सतत खंडित होत आहे.

मान्सून पूर्व कामकाज म्हणून गाजरवाडीजवळील नदीपात्रातील पाईपलाईन अनेक दिवसांपासून लिकेजेस होती, त्यासाठी सोळा गाव पाणीपुरवठा समितीने दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला होता, ते काम पूर्ण होते, तोच तब्बल 12 तास वीजपुरवठा खंडित झालेला होता.

त्यानंतर लगेच मोटारीचा शाफ्ट तुटला, या अशा विविध कारणाने तब्बल निम्मा महिना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. ही पाणीपुरवठा योजना पूर्णपणे बेभरवशाची झाली आहे, त्यामुळे भविष्यात या योजना कितपत पाणीपुरवठा करू शकेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

यासाठी वेळोवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांना सोळागाव पाणी योजना समितीचे शिष्टमंडळ, निवेदने, मंत्रालयातील बैठकी झाल्या आहे, पण यावर रामबाण उपाययोजनांच्या प्रतीक्षेत सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतील जनता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com