Video : जीवाचा आटापिटा! रोहिलेत तीन महिन्यांपासून पाणीबाणी, गंभीर परिस्थिती एकदा पाहाच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील रोहिले (Rohile) गावातील एक गंभीर दृश्य समोर आले आहे. या गावात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी (Water) वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथील महिलांना हंडा मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन (Agitation) केले. यावेळी एका महिलेने गाडीखाली येत जीव देण्याचा प्रयत्न केला आहे...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रोहिले नावाचे एक गाव आहे. या तालुक्यात पर्जन्यमान चांगले असले, तरी उन्हाळा सुरू होताच येथील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होते. पिण्याच्या पाण्यासाठी रोहिले गावातील महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. दोन महिन्यानंतर पाणी येते मात्र तेदेखील गढूळ. त्यामुळे येथे आजारांचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. ग्रामसेवकांना अनेकदा तक्रारी करूनदेखील पाणीप्रश्न काही सुटत नाही. यामुळे महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आले. गावातील एका महिलेने गाडी खाली जीव देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी येथील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ दररोज चार टँकर देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. यानंतर रोहिले येथील महिलांनी पवार यांचे आभार मानले आहे.

रोहिले गावातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांचा आटापिटा आणखी किती काळ सुरु राहणार? पाण्याच्या या गंभीर समस्येवर काही तोडगा निघणार का? रोहिले गावाला आता तरी पिण्यासाठी पाणी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रोहिले गावात गावकऱ्यांनी माझी गाडी अडवली. त्यावेळी येथील महिलांनी मला येथील पाणी टंचाईबाबत सांगितले. मला पाणी दाखवले असता ते पाणी इतके गढूळ आहे की, ते कोणी पीऊच शकत नाही. त्यामुळे मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तत्काळ या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.

- अमृता पवार, माजी सदस्या, जिल्हा परिषद, नाशिक.

Related Stories

No stories found.