कळवणसाठी 2.25 दलघफू पाणी आरक्षित

कळवणसाठी 2.25 दलघफू पाणी आरक्षित

कळवण । प्रतिनिधी Kalwan

कळवण ( Kalwan )शहराच्या वाढत्या विस्तारामुळे लोकसंख्यादेखील ( Population) वाढत आहे. उपलब्ध साधनातून भविष्यात कळवण शहराला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती लक्षात घेऊन आ. नितीन पवार( MLA. Nitin Pawar ), कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी जलसंपदा विभागाकडून ( Department of Water Resources ) कळवण शहरासाठी 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करून घेतल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याने कळवणकरांना दिलासा मिळाला आहे.

शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, मेनरोड, सावरकर चौक, मोहल्ला, ओतूररोड इत्यादी नगरपंचायतींच्या 17 प्रभागांत कळवण शहर विस्तारले आहे. ग्रामपंचायत असताना असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून कळवण शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक नगरपंचायतच्या माध्यमातून सद्यस्थितीत केली जाते. सध्या कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाने चणकापूर धरणातून 0. 86 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर आहे.

अर्जुन (नकट्या) बंधार्‍याचे विघ्न मिटवण्यात तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार, आ. नितीन पवार, तत्कालीन पंचायत समिती सभापती गटनेते कौतिक पगार यांना यश आल्यामुळे चणकापूरच्या पाण्याचे आवर्तन मालेगावकरांसाठी सोडल्याने गिरणा नदीपात्रातील नकट्या (अर्जुन) बंधारा पाण्याने ओसंडून वाहत असल्याने कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळतो. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com