अवर्षणप्रवण गावांचा पाणीप्रश्न सुटणारः पालकमंत्री भुजबळ

अवर्षणप्रवण गावांचा पाणीप्रश्न सुटणारः पालकमंत्री  भुजबळ

येवला । प्रतिनिधी Yeola

जलजीवन मिशनअंतर्गत ( Jaljeevan Mission )येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी( Water Supply Scheme ) पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे राजापूरसह 41 अवर्षणप्रवण व दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Bhujbal ) यांनी केले.

येवला तालुक्यातील ( Yeola Taluka ) पन्हाळसाठे व पिंपळखुटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी असलेल्या जागेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ( Maharashtra Jeevan Pradhikaran ) अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, अंबादास बनकर, वसंत पवार, राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार, सचिन कळमकर, तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, सरपंच धनराज पालवे, नगरसूलच्या सरपंच मंदाकिनी पाटील, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, परशराम दराडे, बाळासाहेब दाणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, 2012 साली या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. योजनेसाठी 3.5 एकर जागेची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सहकार्यातून आवश्यक भूमी संपादन प्रक्रिया रितसरपणे पार पाडली जाणार आहे.

राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळमखुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, घुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, अडसुरेगाव, धामणगाव, लहित, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळमबुर्द, कोळगाव, कुसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशापूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या 41 अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांना ( villages in drought prone areas ) या योजनेचा लाभमिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com