पाथर्डी परिसरात पाणीबाणी; महिलावर्ग संतप्त

पाथर्डी परिसरात पाणीबाणी; महिलावर्ग संतप्त

इंदिरानगर । वार्ताहर | Nashik

आमच्या भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा (Water supply) होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली असून सुधाभाऊ आम्हाला पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या तसेच घंटागाडी नियमित येत नसल्याने

आरोग्याचा प्रश्नही (health issue) बिकट झाल्याची तक्रार पाथर्डी (Pathardi) गावठाण आणि मधुकर कॉलनी परिसरातील लोकांनी शिवसेना (shiv sena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केल्यानंतर त्यांनी त्वरित या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केल्याने हे दोन्ही प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा (Water stock) असतांनाही 8 ते 10 दिवस पाणीपुरवठा (Water supply) होत नसल्याने पाथर्डी गावठाण आणि मधुकर कॉलनी परिसरातील महिलावर्गाच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी शिवसेना महानगरप्रमुख यांना याबाबत कळविले असता बडगुजर तातडीने पाथर्डी परिसरात (Pathardi area) भेट दिली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.आमच्या भागात पाणीच येत नाही आणि पर्यायी काही व्यवस्थाच नसल्याने आमचे अत्यंत हाल होत असून यात काही सुधारणा न झाल्यास आम्हाला या भागातून स्थलांतर केल्याशिवाय पर्यायच उरणार नाही

अशा तीव्र भावनाही बोलून दाखविल्या.तसेच घंटागाडी नियमित येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्यही पसरल्याचे त्यांनी सांगितले.बडगुजर यांनी या लोकांना धीर देत संबंधित अधिकारी वर्गास पाचारण केले व त्यांच्यासमवेत परिसराचा फेरफटका मारला व वस्तुस्थिती जाणून घेतली असता अधिकार्‍यांनी तातडीने हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाळकृष्ण सिरसाट, श्रुती नाईक,शारदा दोंदे,भारती पाईकराव, सिद्धार्थ दोंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान पाणी पुरवठा अधिकारी पगारे (Water Supply Officer Pagare) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात उद्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करणार असून समस्या सोडविणार असल्याचे सांगितले तर वार्डाचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनी ही यासंदर्भात मधुकर कॉलनीत व्हाल मुळे पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे सांगताना या भागात नवीन कर्मचारी आल्याने ही काही प्रश्न उद्भवत असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.