पुन्हा फुटली कडवाची पाईपलाईन

ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
कडवाची पाईप लाईन फुटल्याने अगासखिंडजवळ असे पाणी वाया जात होते
कडवाची पाईप लाईन फुटल्याने अगासखिंडजवळ असे पाणी वाया जात होते

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शहराला पाणीपुरवठा (Sinnar city water supply) करणाऱ्या कडवा योजनेची पाईपलाईन (kadawa scheme pipeline) पुन्हा तालु्नयातील आगसखिंड शिवारात फुटल्याची घटना आज (दि.1) सकाळी साडेसात च्या सुमारास घडली. ऐन उन्हाळ्यात पाईपलाईन फुटुन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय (Water wastage) झाला आहे....

काही दिवसांपूर्वीच आगसखिंड शिवारात (Agaskhind area) कडवाची पाईपलाईन फुटल्याने (pipeline broken) परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकात व गावामध्ये पाणी शिरले होते. यामुळे काही शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानही झाले होते. अशात पुन्हा या शिवारातच पाईपलाईन फुटल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामारे जावे लागले.

आगसखिंड परिसरातील खणक मळ्यात काशिनाथ केशव बरकले यांच्या शेत गट नं. 220 मध्ये पाईपलाईन अचानक फुटली. सकाळी 7.30 च्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांंच्या हा प्रकार लक्षात आला. बरकले यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या (water supply dept) अभियंता हेमलता दसरे (Engineer Hemlata Dasare) यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जवळपास 1 तास पुर्ण दाबाने पाणी बाहेर पडत असल्याचे बरकले यांनी सांगितले. काही वेळानंतर दसरे यांच्याशी संपर्क होताच बरकले यांनी पाईपलाईन फुटल्याचे फोटो पाठवल्यानंतर दसरे यांनी पाणीपुरवठा थांबवण्याच्या सुचना सेवकांना केल्या. मात्र, तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

दुष्काळात तेरावा

यंदा तालु्नयात पुरेसा पाऊस न पडल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत (Water supply disturb) झाला असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. नियोजित वेळेपेक्षा 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा उशीरा होत असल्याने काहींना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. कडवा धरणात सध्या मुबलक पाणीपुरवठा असला तरी तीन महिन्यांसाठीच हा पाणीसाठा उपयुक्त ठरणार आहे. अशात पाईपलाईन फुटुन लाखो लिटर पाण्याचा अपव्यव होत असेल तर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com