22 गाव योजनेला गळती

22 गाव योजनेला गळती

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

मनेगावसह (manegaon) 22 गाव पाणी पुरवठा योजनेच्या (Water supply scheme) पाईपलाईनवर (Pipeline) देवपुर फाटा शिवारात गळती झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया (Water wasted) गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून योजनेवरील पांगरीसह आसपासच्या काही गावांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून पिण्याच्या पाण्यासह (drinking water) वापरण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी 5 हजारांचा खर्च येत आहे.

22 गाव पाणी पुरवठा योजनेतील पांगरी हे शेवटचे गाव असून 8 ते 10 दिवसांतून एकदा गावच्या विहीरीत शुल्लक प्रमाणात पाणी टाकले जाते. हेच पाणी गावातील महिला या विहीरीतून ओढून पिण्यासाठी नेत असतात. मंगळवारी (दि.19) देवपुर फाट्याच्या पुढे शिरोळे वस्तीजवळ या योजनेच्या पाईपलाईनवरील

एअर पाईंटच्या ठिकाणी लिकेज (Leakage) झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. सुमारे 4 ते 5 तास ही गळती सुरु होती. त्यामुळे गावाला काही प्रमाणात मिळणारे पाणीही अशा प्रकारे वाया जाणार असेल तर दुष्काळात (Drought) तेरावा महिना अशीच भावना पांगरीकर व्यक्त करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com