अप्पर कडवा धरणातील पाणी आरक्षित करणार - आ. कोकाटे

अप्पर कडवा धरणातील पाणी आरक्षित करणार - आ. कोकाटे

सिन्नर । वार्ताहर Sinnar

इगतपुरी तालुक्यात Igatpuri Taluka भरपूर धरणे आहेत. मात्र, त्याचा फायदा टाकेद-खेड गटातील Taked- Khed बहुतांश गावांना होत नाही. त्यामुळेच अप्पर कडवा धरणातील Kadva Dam काही पाणी प्राधान्याने आरक्षित ठेवण्यात Water Reservation येईल अशी ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे MLa Manikrao Kokate यांनी दिली.

सर्वतीर्थ टाकेद Sarvtirth Taked येथे आयोजित बैठकीत आ. कोकाटे बोलत होते. याप्रसंगी नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, सहायक अभियंता केतन पवार, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक अभियंता चैतन्य वाघमारे, चंद्रकांत खाडे, पांडुरंग बहे, पंढरी बहे, सुनील वाजे, अशोक वाजे, बाळासाहेब घोरपडे उपस्थित होते.

धरणात जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बाजार मूल्याच्या पाचपट मोबदला देण्यात येईल किंवा शेतकर्‍यांच्या मागणीनुसार जमिनीच्या बदल्यात जमीन दिली जाईल असेही आ. कोकाटे म्हणाले. अप्पर कडवा धरणासंदर्भात शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी अनेक वर्षांपासून उत्पन्न नसलेल्या खडकाळ, ओसाड माळरान जमिनीला समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बाजारमूल्याच्या पाचपट दर देण्यात येणार असल्याचे आ. कोकाटे म्हणाले.

अप्पर कडवा धरण उभारणीत सात गावांतील शेतकर्‍यांचे 475 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहेत. यातील बहुतेक शेतकर्‍यांच्या जमिनी जिरायती आहेत. त्यात टाकेद बुद्रुक, टाकेद खुर्द, बारीशिंगवे, आधारवड, खेड, वासाळी, घोरपडेवाडी, सोनोशी गावांतील शेतकर्‍यांचा समावेश आहे. धरण उभारल्यानंतर 1495 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com