Video : शिवनदी पुलावरुन पाणी, या गावांचा संपर्क तुटला

Video : शिवनदी पुलावरुन पाणी, या गावांचा संपर्क तुटला

नाशिक | Nashik

बाऱ्हे ते खोकरविहीर (Shikar vihir road) मार्गावर झगडपाडा गावाजवळ असलेल्या शिवनदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतुक ठप्प (Traffic Congestion) झाली आहे. तर आजूबाजूच्या अनेक गावांचा संपर्क तुटला (Destroy Connection) आहे.

गेल्या दोन तीन दिवसापासून सुरगाणा तालुक्यात (Sarvana taluka) मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्याना पूर आला आहे. अशातच बाऱ्हे ते खोकरविहीर मार्गावर खिर्डी पाडा रस्त्याला असलेल्या फरशी पुलावरून आज सकाळपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून झगडपाडा, खोकरविहिर, चींचपाडा, चिऱ्याचापाडा, भेनशेत, देऊळपाडा, कहांडोळपाडा, उंबुरने, खिर्डी, भाटी, वडपाडा, सागपाडा, खोबळा , वांगण पाडा, खिरपाडा आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान येथील जवळपास च्या गावांना याच रस्त्याने बाऱ्हे येथे दवाखाना, इतर कामासाठी जावे लागते. परंतु पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तर सुरगाणा, सुरगाणा नाशिक साठी देखील याच मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.

अनेक वर्षांपासून या पुलाची परिस्थिती जैसे थे आहे. अनेकदा रस्त्याच्या सुधारणेसह पुलाची मागणी करूनही अद्याप काहीच पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे आजही एखाद्या गंभीर रुग्णास डोली बांधून नदी पलीकडे न्यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी मोठा पूल होणं गरजेचं आहे.

- योगीराज गवळी, ग्रामस्थ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com