भुयारी रस्ते जलमय

भुयारी रस्ते जलमय

पिंपळगाव बसवंत। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जुना आग्रारोडसह उंबरखेड चौफुली उड्डाणपूल, गुरुकृपा संकुल, बोरस्ते टॉवर्स या तीन बोगद्यासह सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.

पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने उड्डाणपुलाखालील बोगद्यांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागली. तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली होती.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरासह जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर पाणीच पाणी साचले होते. सोयाबीन, टोमॅटो पिकाबरोबरच द्राक्ष छाटणी झालेल्या बागा फुटण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्‍यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com