उद्योग क्षेत्रात पाणीच पाणी

रस्ते जलमय
उद्योग क्षेत्रात पाणीच पाणी

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सलग दोन दिवस बरसणार्‍या पावसामुळे Heavy Rain औद्योगिक क्षेत्रातील Industrial Area पावसाच्या पाण्याचा निचर्‍याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.प्रशासनाच्या तयारीअभावी ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचे चित्र होते.

अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेन्स कंपनीसमोरच्या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कारची अर्धी चाके पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने रस्ते जलमय झाले.

अंबड गावापासून औद्योगिक वसाहतीतून वेअर हाऊसजवळून जाणार्‍या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावलावर खड्डे व त्यात साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडताना दिसली. परिसरातील वाहतूक कमालीची संथ होऊन वाहतूक कोंडी झाली. खड्डे चुकवताना अवजड वाहनांची मोठी तारंबळ उडत होती.

रस्त्यावरून नदी वाहत असल्याने त्या पाण्यातून जाताना कामगारांंची मोठी धांदल उडाली. अनेक कारखान्यांच्या आवारातही रस्त्यावरील पाणी शिरल्याने उद्योजकांना मालवाहतूक करणे, कामगारांना कंपनीत जाणे, कंपनी आवारात वाहने उभी करणे अवघड झाले.

उद्योग क्षेत्राला गृहीत धरणे थांबवा

औद्योगिक क्षेत्रातून सातत्याने मागणी करूनही प्रशासन योग्यवेळी कार्यवाही करत नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत मोठी अडचण निर्माण होते. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची वेळीच व्यवस्था करणे, रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारणे, खराब रस्त्यांची दुरुस्ती वेळेत करणे आदी गोष्टींकडे लक्ष दिले गेले असते तर आज उद्योजकांना संकटाला सामोरे जावे लागले नसते. उद्योजकांना गृहीत धरणे थांबवावे.

वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com