Video : गिरणा धरण ९२ टक्के भरले; विसर्गाला सुरुवात नदीकाठी सावधानतेचा इशारा
नाशिक | प्रतिनिधी Nashik
चणकापूर, हरणबारी (Chankapur, Haranbari Dam) धरणातून (Dam) पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरु असल्यामुळे गिरणा धरण (Girna Dam) भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज दुपारी 12 वाजता धरण 91.80% टक्के भरले. यानंतर तात्काळ धरण सुरक्षितततेच्या दृष्टीने वरून येणारे जास्तीचे पुराचे पाणी गिरणा नदीत पात्रात सोडण्यात आले आहे....
यानुसार गिरणा धरणाचे (Girna Dam) दोन वक्रदरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. या दोन्ही दरवाजांमधून नदीपात्रात एकूण 2 हजार 476 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या नदीत होत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असेही याप्रसंगी सांगण्यात आले आहे.
तरी नदीकाठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये व तसेच गुरे ढोरे नदीजवळ नेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. गिरणा पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगावकडून नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.