दारणातून विसर्ग सुरु; गंगापूर धरणसाठ्यात मोठी वाढ

दारणातून विसर्ग सुरु; गंगापूर धरणसाठ्यात मोठी वाढ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कालपासून गंगापूर धरणसमूहात (Gangapur Dam) पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत नाशिक शहरात ३६.२४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असला तरीदेखील गंगापूर धरणात १८-२० टक्क्यांची वाढ एकाच दिवसांत झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे....

गंगापूर धरण (File Photo)
गंगापूर धरण (File Photo)

गंगापूर धरण क्षेत्रात २३४ मिमी इतका पाऊस पडला असून पाणलोट क्षेत्रातून मोठी आवक होऊ लागल्याने गंगापूर धरण ४९.७१ टक्के भरले आहे.

दुसरीकडे दारणा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात (Darna Dam) पाऊस सुरु असून जलाशयातील पाणीसाठा आज सकाळी ७५% झाला आहे. त्यामुळे दारणा जलाशयातून विद्युत गृहाद्वारे आज सकाळी १० वाजता ५५० क्यूसेक्स विसर्ग (Water Discharge) सुरु करण्यात येत आहे.

पाऊस सुरुच राहील्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयाचे रेडीयल गेट्सच्या मधून आणखी विसर्ग करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com