जलसेतू दुरुस्तीनंतर भोजापूरमधून आवर्तन

जलसेतू दुरुस्तीनंतर भोजापूरमधून आवर्तन

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

भोजापूर धरणापासून (Bhojapur Dam) अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जलसेतुला गळती लागल्याने कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पूरपाणी बंद करण्यात आले होते. त्यानतंर पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) जलसेतची दुरुस्ती केल्यानंतर चार दिवसांनी पुन्हा एकदा धरणातून पूर पाण्याचे आवर्तन (water discharge) सोडण्यात आले आहे.

सात दिवसाच्या कालावधीत फक्त अडीच दिवस पूरपाणी सुरु होते. पंधरा ते सोळा किलोमीटर कालव्यापर्यंत पाणी पोहचताच बंद झाल्याने शेतकर्‍यांनी (farmers) नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान पाटबंधारे विभाग (Irrigation Department) गेल्या तीन दिवसापासून जलसेतू दुरुस्तीसाठी युध्दपातळीवर काम करत होता. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसाने म्हाळुंगी नदीला पूर आल्याने भोजापूर धरण (Bhojapur Dam) ओव्हरफ्लो (overflow) झाले होते.

दोन वर्षानतंर धरण भरल्याने पुर्व भागात कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाने नियोजन करून सोमवारी कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात आले होते. नांदूरशिंगोटे (Nandoorshingote) शाखेवरील तालुक्यातील दुशिंगपूर व माळवाडी तसेच संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) सोनेवाडी व पिंपळे या ठिकाणी पाण्याचे आवर्तन जाणार होते त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार होती.

मात्र बुधवारी सायंकाळी धरणापासून जवळ असलेल्या 150 मीटर लांबीच्या जलसेतुला काही प्रमाणात गळती लागल्याची माहिती परिसरातील शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यानतंर कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पूरपाणी बंद करण्यात आले होते. जलसेतूच्या तळातील भागात असणारे अस्तरीकरणास गळती तसेच जुन्या जाँईटच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात भरावा खचल्याने पाण्याची गळती सुरु झाली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी युध्दपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

जलसेतची लांबी मोठी असल्याने एक दिवस पुर्ण दोन इंजिन व जनरेटरच्या सहाय्याने त्यातील पाणी उपसण्यात आले. त्यानतंर जलसेतुच्या आतील तसेच खालील बाजुने सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले व जाँईटच्या ठिकाणी भरावा करण्यात आला. जलसेतुला पुन्हा गळती लागणार नाही याची खात्री झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या सुचनेनुसार रविवारी दुपारी धरणातून 50 क्युसेसने कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा वितरिकापर्यंत पाणी पोहचण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com