हरणबारीतून सिंचनासाठी आवर्तन

पाणीपुरवठा योजनांना लाभ; मोसम खोर्‍यात शेतकर्‍यांना दिलासा
हरणबारीतून सिंचनासाठी आवर्तन

नामपूर । वार्ताहर | Nampur

बागलाणसह (baglan) मालेगाव तालुक्याला (malegaon taluka) वरदान ठरलेल्या हरणबारी धरणातून (Haranbari Dam) शेती सिंचनासाठी (Agricultural Irrigation) पाटबंधारे विभागातर्फे (Irrigation Department) अखेर तिसरे आवर्तन (water discharge) सोडण्यात आले आहे.

या आवर्तनामुळे शेती सिंचनासह मोसम नदीकाठावरील (mosam river) पाणी पुरवठा (Water supply) करणार्‍या विहिरींसह कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट (drinking water issue) देखील टळणार असल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे (heavy rain) यंदा हरणबारी धरण तुडूंब भरून ओव्हरफ्लो (Overflow) झाले होते. धरणात 1166 द.ल.घ.फुट जलसाठा आहे. त्यामुळे 700 द.ल.घ.फुट पाणी शेती सिंचनासाठी तर उर्वरित जलसाठा उन्हाळ्यात पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. हरणबारी धरणातून शेती सिंचनासाठी तीन पाण्याचे आवर्तने दिली जात होती.

मात्र गत काही वर्षापासून या निर्णयात बदल करण्यात येवून फक्त दोनच आवर्तने शेती सिंचनासाठी (Agricultural Irrigation) दिली जात होती. यामुळे बागलाण (baglan), मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) पाणी वाटप संस्थांची नामपूर येथे बैठक होवून हरणबारीतील उपलब्ध जलसाठा लक्षात घेत तसेच पाण्याअभावी मोसमखोर्‍यात रब्बी हंगामातील (rabbi season) पिकांची होत असलेली होरपळ व पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) कोरड्याठाक पडत असल्याने निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईचे संकट (Crisis of water scarcity) दूर करण्यासाठी हरणबारीतून

शेतीसिंचनासाठी (Agricultural Irrigation) तीन पाण्याचे आवर्तन दिल्यास शेतीसिंचनाबरोबर पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच कुपनलिकांना देखील या आवर्तनाचे पाणी उतरून त्याचा लाभ ग्रामस्थांना होत असल्याने तीन आवर्तने सोडावेत, अशी जोरदार मागणी पाणी वाटप संस्थांच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागातर्फे यंदा तिसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गत काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील गहु, हराभरा, कांदा पिकांवर होत आहे. पाण्याअभावी पिके उन्हाच्या तडाख्याने करपू लागल्याने शेतकरी (farmers) कासावीस झाले होते. रब्बी पिकांना पाण्याची गरज भासत असल्याने हरणबारीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी मोसमखोर्‍यातून जोर धरू लागली होती.

या मागणीची दखल पाटबंधारे विभागातर्फे तातडीने घेण्यात येवून तिसरे आवर्तन सोडण्यात आले. सुमारे चारशे क्युसेस पाण्याचा विसर्ग गेटमधून मोसम नदीपात्रात वाहत असून पुढील दोन दिवसात मालेगांवपर्यत पाणी पोहचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा मोसम ख़ोर्‍यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. महावीतरणचा भोंगळ कारभाराला शेतकरी त्रस्त झाले आहेत. केव्हाही वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले होते.

या आवर्तनामुळे रब्बी हंगामातील पिकांसह गुरांच्या पिण्याचा व चार्‍याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. रब्बी पिकांसाठी वेळेवर पाण्याचे आवर्तन मिळाल्याने कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्यासह गहू, हरभरा आदी पिकांसाठी देखील हे पाणी लाभदायी ठरणार असल्याने मोसमखोर्‍यातील शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे हरणबारी आवर्तन पाण्याचा योग्य व काट कसरीने वापर करण्याचे आवाहन पाणी वाटप सहकारी संस्थाचे पदाधिकारी पवन ठाकरे, नंदलाल शिरोळे, सोमनाथ ब्राम्हणकर, पंडित मोरे, अशोक सावंत, राजाराम पाटील, बाळासाहेब भदाने, जयवंत कोर, नरेंद्र सोनवणे यानी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com