नाशिककरांनो ! फक्त 'इतक्या' दिवसांचा पाणी साठा शिल्लक

महापौरांनी घेतली पाणी कपात आढावा बैठक
नाशिककरांनो ! फक्त 'इतक्या' दिवसांचा पाणी साठा शिल्लक

नाशिक | Nashik

नाशिक शहरासाठी (Nashik City) गंगापुर धरणातून (Gangapur Dam) पाणी उचलण्यात येते. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात (Gangapur dam catchment area) व शहरात पावसाने ओढ दिल्याने नाशिक शहरातील नागरीकांना पिण्याचे पाणी (drinking Water) परिस्थिती जाणुन घेण्यासाठी महापौर सतिश नाना कुलकर्णी (Mayor satish Kulkarni) यांनी आज सोमवार दि.१२ रोजी पाणी पुरवठा विभागाच्या (Water Supply Department) अधिका-यां समवेत आढावा बैठक (Water Review Meeting) घेउन उपलब्ध पाणी साठया बाबत माहीती जाणुन घेतली.

सध्या गंगापुर धरणामध्ये 1900 एमसीएफटी पाणी साठा शिल्लक (Water storage balance) असुन त्यापैकी 800 एमसीएफटी हा साठा मृतसाठा म्हणुन गृहीत धरुन व 300 एमसीएफटी पाणी हे रोटेशन (Rotation) साठी दयावे लागणार असल्याने तसेच 200 एमसीएफटी पाणी साठा हा एमआयडीसी (MIDC) व इतर वापरासाठी असा एकुण 1300 एम सीएफटी साठा वगळता उर्वरीत शिल्लक 600 एमसीएफटी पाणी साठा हा शहरवासींयांसाठी वापरता येउ शकतो.

वास्तविक मनपाचे गंगापुर धरणातील पाणी आरक्षण हे तीनच दिवसांचे शिल्लक आहे. एकंदर दैनदिन शहरासाठी लागणारे पाणी विचार करता शिल्लक साठा हा 40 दिवसच पुरेल इतका असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे वतीने सांगण्यात आले.

सदरच्या बैठकीत पाणी साठयाचा आढावा घेता येत्या रवीवार पर्यंत धरण व पाणलोट क्षेत्रात पाउस न झाल्यास पुढील सोमवारी पुन्हा अधिका-यांसमवेत सर्व गटनेत्यांची आढावा बैठक (Review meeting of group leaders) घेण्यात येईल असे सतिश नाना कुलकर्णी यांनी सांगितले आहे. यामध्ये रविवार पर्यंत पाउस न पडल्यास आठवडयातुन संपुर्ण एक दिवस पाणी कपात करावी लागेल असा अंदाज व्यक्त करणेत आला. त्या कारणाने मा.महापौर सतिश नाना कुलकर्णी यांनी शहरवासीयांना भविष्यात दिसणारे पाणी संकट टाळण्यासाठी पाणी जपुन वापरण्याचे आवाहन केले आहे.

सदर बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता नलावडे, अधि.अभि. चव्हाणके, अधि.अभि.(यां) धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता धनाईत आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com