लासलगावसह १६ गावांना पाणी टंचाई

लासलगावसह १६ गावांना पाणी टंचाई

महिन्यात अवघे चार वेळा पाणी

लासलगाव | Lasalgoan

लासलगाव विंचुर सह १६ गांव पाणी पुरवठा यंत्रणेचा बिघाड झाल्याने संपुर्ण नागरिकांचे गेल्या आठ ते दहा दिवसांपासन पाण्यासाठी अतोनात हाल सुरु आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे कडे पाईप लाईन नुतनीकरणासाठी प्रयत्नांचे पाढे गेल्या ४ ते ५ वर्षांपासन १६ गांव पाणी योजनेचे शिल्पकार माजी आमदार कल्याणराव पाटील, जि प सदस्य ज्ञानेश्वर जगताप, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, प्रकाश दायमा, यांचा १६ गावांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न शासनाच्या वतीने सोडविण्याचा प्रयत्न आहे.

ही गंभीर बाब लक्षात घेता प्रभाग क्रमांक २ ५ व६ वार्ड मध्ये टँकरद्वारे पाणी पोहचविण्यासाठी बाजार समिती च्या सहकार्याने ग्रामपंचयत विरोधी गटाचे सदस्य सुवर्णा जगताप, संगीता पाटील, अमोल थोरे, रोहित पाटील, ज्योती निकम यांनी पाणी पुरवठा केला. यासाठी प्रशांत जगताप, अभिजीत जाधव, गोकुळ कहाणे, अक्षय पाटील यांनी सहकार्य केले.

महिन्यात अवघे चार वेळा पाणी

संपूर्ण महिन्या भरात अवघे चार वेळा पाणीुरवठा झाला आहे. अवघे दोन दिवसावर रमजान ईद अक्षय तृतीया चा सण आला आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com