घोटभर पाणी आणि एक घास चिऊसाठी.!

वाजगाव येथील युवकाचा उपक्रम
घोटभर पाणी आणि एक घास चिऊसाठी.!

वाजगाव | Vajgaon

वाजगाव येथील युवक जनार्दन आहेर यांनी पक्षांसाठी दाना व पाण्याची सुविधा केल्याने सध्या पक्षांची चिवचिवाट वाढली आहे.

वाजगाव ता.देवळा येथील फेब्रिकेशन व्यवसायीक जनार्दन आहेर सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व शासनाच्या निर्बंधाच्या अधीन राहत घरी राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा गल्लीत दाना पाण्याच्या शोध घेणाऱ्या पक्षांना पाहिले यावरून आहेर यांच्या मनात पक्षासाठी काही करण्याची कल्पना सुचली.

जनार्दन आहेर यांनी लोखंडी तेलाचा रिकामा डब्बा शोधला व चार बाजुने कापून त्यात दाणे व मध्ये पाण्याची सुविधा केली. यामुळे सध्या आहेर यांच्या घरपरिसरात चिमण्यांची चिवचिवाट वाढलेली दिसुन आली..

यावेळी आहेर म्हटले की, नागरीकांनी आपल्या घरपरिसरात पक्षांसाठी दाणे व पाण्याची खूप नव्हे पण थोडीफार सुविधा आपल्या घरपरिसरात करावी जेणेकरून पक्षांना जीवदान मिळेल पक्षी आहे तर निसर्ग आहे निसर्ग आहे तर आपण राहू.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com