बस आगार की कचरा डेपो

बस आगार की कचरा डेपो

सिन्नर। वार्ताहर Sinnar

सिन्नरच्या सौंदयात भर घालणार्‍या सिन्नर बस स्थानक Sinnar Bus Depot आवारात सध्या ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग बघायला मिळत आहेत. येथील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट असून महिला प्रसाधनगृहात गुटखे व तंबाखूच्या Gutkha's & Tobacco's रिकाम्या पुड्या पडलेल्या दिसत आहेत. यामुळे हा बस डेपो आहे की कचरा डेपो waste depot असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

राज्यातील मोठ्या बसस्थानकांंमध्ये गणना केले जाणार्‍या सिन्नर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असतो. कचर्‍यावर गुटखा, तंबाखू, पान खाऊन थुंकणारे कमी नाही. त्यामुळे परिसराला घाणीचे रुप प्राप्त होत आहे वास्तूला गलिच्छ करण्याचे काम काहीजण करत आहेत. त्यात येथील स्वच्छतागृहाचीही अवस्था बिकट आहे.

स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने महिला त्याचा वापर करण्यासाठीही धजावत नसल्याजे बघायला मिळत आहे. नेहमीच अस्वच्छ राहणार्‍या प्रसाधानगृहात तर गुटखे, बिडी, सिगारेटचे थोटके व पाकिटे पडलेली असतात. महिला स्वच्छतागृहातही गुटखा व तंबाखूच्या रिकाम्या पुड्या दिसून येत आहेत. या स्वच्छतागृहांचा वापर केल्याने आजाराची भीती बळवण्याचीही भीतीही व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.