नियोजना अभावी आयुष्यातील उमेदीची वर्ष जातात वाया

स्पर्धा परिक्षा आणि विद्यार्थी
नियोजना अभावी आयुष्यातील उमेदीची वर्ष जातात वाया

नाशिक । शुभम् धांडे Nashik

कुठल्याही क्षेत्रात काम करतांना सर्वात जास्त अनुभवायला मिळते ती म्हणजे स्पर्धा ( Competition ). त्यात देशातील आणि राज्यातील शासकीय क्षेत्रात अधिकारी होण्याच स्वप्न पाहणार्‍यांसाठी तर स्पर्धा हा खुप मोठा विषय आहे. ज्याची सुरवात त्याच्या नावातुनच होते स्पर्धा परिक्षा !

करोनाच्या पार्श्वभुमीवर न झालेल्या आणि त्यातही पूर्ण झालेल्या पण पद नियुक्ती न झालेल्या परिक्षा, त्यात स्वप्निल लोणकर सारख्या तरुणांची आत्महत्या यामुळे स्पर्धा परिक्षा आणि त्याची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची मानसिकता काय? स्पर्धा परिक्षेंकडे वळण्याची मुख्य कारणे कोणती?असे अनेक प्रश्न विद्यार्थांबाबत पुन्हा नव्याने समोर आले.

स्पर्धा परिक्षांकडे वळण्याची मुख्य दोन कारणे अशी की एक बेरोजगारी आणि दुसरी अस्थिरता. शिक्षण तर वाढत चाललय पण त्या प्रमाणात रोजगाराची संधी उपल्बध नाही. कंपण्यांचा भरवसा नाही.नोकरी आज आहे तर उद्या नाही .त्यामुळे स्थिरता नाही आणि ती स्थिरता कुठे मिळते तर शासकीय नोकरीत त्यामुळे ही स्पर्धा परिक्षांकडे वळण्यांचा कल दिवसें दिवस वाढत आहे.

यातही सर्वांत वेगळ आणि महत्त्वाच कारण म्हणजे ग्लॉमरायझेशन. सोशल मिडीयाच्या जमाण्यात काल पर्यंत कोणाला माहीत नसलेला मुलगा जेव्हा पास होतो .तेव्हा त्याला मिळणारी प्रसिद्धी , सामाजिक ओळख,सन्मान ह्याही गोष्टी त्याला कारणीभुत ठरत आहेत.

हे सर्व असतांना त्यांची मानसिकता काय सांगते की करोनासारख्या अति बिकट प्रसंगात जेव्हा सर्व जग थांबले त्यात परीक्षा ही झाल्या नाहीत ,परंतु ही अनिश्चितता फक्त आताचा मुद्दा नसून तो निरंतर ज्वलंत राहीलेला विषय आहे. एकतर अनेक जागांची गरज असतांना त्यासाठी परीक्षा होत नाही आणि झाल्याच तर त्याच्या पदभरती साठी होणारी दिरंगाई यामुळे परिक्षांना घेवुन सततचा गोंधळ सुरु असतो.

त्यातही अनेक प्रयत्नांनंतर यश मिळत नाही आणि तशी शकताही कमी असते. अशा परिस्थितीत कुटूंबासोबत समाजाचाही दबाव वाढत जातो. या अशा मानसिकतेत मागे वळुन घेतलेल्या शिक्षणावर काही काम करणे हे त्यांच्यासाठी कठीण असत. परंतु ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेत प्रत्येक जण जिंकेल अस होत नाही,त्यामुळे प्लॉन बी आणि शक्य असल्यास प्लॉन सी ही ठेवावा कारण कितीही काही झाल तरी आयुष्य महत्त्वाच आहे.

साधारण एक वर्ष झाले सिलेक्शन होऊन तरीदेखील शासनाकडून नियुक्ती नाही आणि बेरोजगारांसाठी एक वर्ष हा खूप मोठा काळ आहे यामध्ये मानसिक तणाव वाढत जातो कारण इथून पुढे करिअर सुरु होणार असत आणि ते सर्व डिस्टर्ब झाले आहे. शासकीय सेवेमध्ये जे काही प्राधान्यक्रम असतात त्यामध्ये भविष्यात त्याची देखल न घेतल्यास नुकसान होत आहे. या अनुषंगान शासनाने आता हे मौन सोडलं पाहिजे आणि त्यासंदर्भात प्रशासन पातळीवरून काही तरी या विद्यार्थ्यांसाठी रिस्पॉन्स देणे आवश्यक आहे. स्वप्निल लोणकर हे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे पुन्हा कोणी स्वप्निल लोणकर होऊ नये यासाठी कुठेतरी स्टॅन्ड लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे

- मानसी पाटील (उपजिल्हाधिकारीपदी निवड परंतु नियुक्तीच्या प्रतिक्षेत)

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नियुक्ती नाही झाली या कारणाने आत्महत्या केली.एक चांगला व्यक्ती व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे आज या जगात नाहीये.मृत्यू झाला म्हणजे चर्चा होते आणि त्याच्या बाबतीत ही कायम रीघ ओढली जाते पण सर्वव्यापी बदल काही होत नाही.मग हे दुष्टचक्र कुठे थांबायचं?मुळापासून बदल व्हायला मुळालाच जावं लागेल.स्पर्धापरिक्षेत स्थिरता आणण्यासाठी युपीएससीच्या धरतीवर एमपीएससीनेही काम करायला हव.

- विकास दराडे ( स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा विद्यार्थी)

अनेक समस्या आणि प्रश्न

परिक्षांची सततची अनिश्चिता.

वयोमर्यादा, आर्थिकलआणि सामाजिक अडचणी.

आरक्षणाच्या मुद्यावर बदलणारे नियम.

पास झाल्यावरही प्रत्यक्ष पदनियुक्ती ला होणारी दिरंगाई.

वाढती काम करणार्यांची संख्या,त्याप्रमाणात नसलेली नोकर भरती

कोरोनाच्या संसर्गात ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेले क्लास.

वेळेवर पुढे ढकलण्यात येणार्या परिक्षा.

पंचवर्षीक योजना म्हणुन लागलेला डाग,

फक्त निवडणुक काळत होणारी अधिकची भरती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com