महावितरणविरोधात रान पेटवू; शेतकरी संघटनेचा अधिकार्‍यांना इशारा

महावितरणविरोधात रान पेटवू; शेतकरी संघटनेचा अधिकार्‍यांना इशारा

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nashik District Central Cooperative Bank) व वीज महामंडळाच्या (Electricity Corporation) आडमुठे धोरणाविरोधात आता शेतकर्‍यांनीच (farmers) पेटून उठले पाहिजे, असे आवाहन स्व. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे (Arjun Borade, District President of Farmers Association) यांनी केले.

जिल्हा सहकारी बँक व महावितरण कंपनीच्या (MSEDCL) गलथान कारभाराविषयी शेतकर्‍यांनी (farmers) संघटित व्हावे, या दृष्टिकोनातून आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते. बोराडे म्हणाले, जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीविरोधात जिल्हा शेतकरी संघटनेचे सहकारमंत्री अतुल सावे यांची भेट घेतली असून, भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा सहकारी बँकांनी सक्तीची वसुली स्थगिती करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. वास्तविक, अशी कोणतीही स्थगिती दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

उलट जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली अधिक तीव्र केली असून त्याविरोधात शेतकर्‍यांनी पेटून उठले पाहिजे असेही बोराडे म्हणाले. याशिवाय शहराला 24 तास वीजपुरवठा (power supply) केला जातो. कारखानदारांनाही दिवसा 24 तास वीजपुरवठा होतो. मात्र, शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा देण्याऐवजी रात्रीच्या वेळी व आठच तास दिला जातो. दिवसा वारंवार वीजपुरवठा खंडित (Power outage) होतो.

शेतकरी देशाचे नागरिक नाही का, शेजारच्या राज्यांमध्ये शेतकर्‍यांना 24 तास व मोफत वीज दिली जाते. महाराष्ट्रात मात्र कोणतेही सरकार आले तरी ते फक्त घोषणाच करते. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरी काहीही पडत नाही. अशावेळी आता शेतकर्‍यांनी संघटित होऊन शेतकरी हिताचे पॅनल निवडून दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया बोराडे यांनी दिली. याप्रसंगी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण बोंबले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com