रखडलेल्या महामार्ग कामाविरोधात आंदोलनाचा इशारा

रखडलेल्या महामार्ग कामाविरोधात आंदोलनाचा इशारा

वावी । वार्ताहर | Vavi

सिन्नर-शिर्डी (Sinner-Shirdi) या राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) रुंदीकरणाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून धीम्या गतीने सुरु असल्याचे याचा फटका वाहनधारकांसह महामार्गालगतच्या गावांना बसत आहे.

वावी (Vavi) परिसरात सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या (flyover) कामामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा (traffic jam) समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. येत्या महिनाभरात येथील काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा (agitation) इशारा छावा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मोंटो कार्लो (Monte Carlo) या कंपनीने घेतले असून त्यांच्याकडून कामात दिरंगाई होत आहे. महामार्गा लगत असणार्‍या व्यावसायिक व घरांचा मोबदला देऊन ती खाली करण्यात आली तरी सुद्धा या रस्त्याचे काम (road work) अजूनही पूर्ण झाले नाही.

भरावा पूल (bridge) रस्ता अजून चालू न झाल्याने सव्हिस रोडवर वाहतुकीचा बोजा पडत आहे. यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतुक कोंडीचा (traffic jam) प्रश्न उद्भवत आहे. याचा फटका वावीकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताच्या (accidents) प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात वावीलगत असणार्‍या साई शर्वरी लॉन्स जवळ माय-लेकाचा दुर्दवी अपघात होऊन मृत्यू झाला होता.

त्याठिकाणी स्पीड ब्रेकर (Speed ​​breaker) किंवा वाहतूक फलक असता तर कदाचित ही घटना टळली असती. अरुंद सर्विस रोड (narrow service road) व धिम्या गतीने काम सुरु असल्याने साई भक्त निवास समोरील फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, दुसंगवाडी, वावी पोलीस ठाणे व त्या मार्गे गावात येणारा मार्ग अजूनही मोकळा करण्यात आला नाही. त्यामुळे संपूर्ण वाहतीकीचा बोजवारा उडाला असून वावी, मीठसागरे रोडवरील बोगद्यावर त्याचा भार पडत आहे.

त्यामुळे तेथे सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची मोठी कोंडी होताना दिसत आहे. येत्या महिनाभरात जर कामात प्रगती दिसली नाही तर ग्रामस्थांसोबत आंदोलन (agitation) करण्याचा इशारा छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कंपनीला निवेदनाद्वारे (memorandum) दिला आहे.

यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दिलीप पाटील तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन या कामासंदर्भात माहिती दिली आहे. मोंटो कार्लो कंपनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत आहे. धीम्या गतीने काम सुरु असल्याने व्यावसायिकांसह वाहनधारकांना, ग्रामस्थांचा त्याचा फटका बसत आहे. कंपनीने त्यांची हद्द निश्चित करावी. जेणेकरुन व्यावसायिकांना उर्वरित जागेत आपले व्यवसाय करता येऊन शकतात. तसेच बिघडलेले दळणवळण सुधारता यामुळे सुधारेल.

- सुनील काटे, सामाजिक कार्यकर्ते

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com