गोदामांना आग; लाखोंची हानी

गोदामांना आग; लाखोंची हानी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मनमाड (manmad) चौफुली परिसरातील तीन गोदामांना अचानक लागलेल्या आगीत (fire) लाखोंचे नुकसान झाले. शुक्रवारच्या सुट्टीमुळे गोदामे (warehouse) बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या बंबांनी 9 फेर्‍या करत आग आटोक्यात आणली.

मनमाड चौफुली भागात ऑईल (oil) साठवणुकीच्या पत्र्याच्या गोदामाला अचानक आग लागली. ऑईलमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील रद्दी व वाहनांच्या जुन्या टायरचे गोदामही आगीच्या वेढ्यात सापडले. याचवेळी मनपा उपायुक्त राजू खैरनार (Municipal Corporation Deputy Commissioner Raju Khairnar) या भागातून जात असतांना आग (fire) लागल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी अग्निशमन दलास (Fire brigade) माहिती दिली.

अग्निशमन अधिक्षक संजय पवार (Fire Superintendent Sanjay Pawar) यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत 9 अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुट्टीमुळे गोदामे बंद होती. त्यामुळे मालक किंवा कामगार गोदामात उपस्थित नसल्याने जिवीतहानी टळली. तथापि रद्दी, जुने टायर व साठवणूक केलेले ऑईल आगीत भस्मसात झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com