Nashik : वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला

Nashik : वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला

नाशिक | Nashik

येथील गंगापूर रोडवरील (Gangapur Road) एका रुग्णालयातील वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने (scissors) वार करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर रोडवरील एका रुग्णालयात (Hospital) रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सातत्याने विविध तक्रारी रुग्णालय व्यवस्थापनाकडे येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत संबधित महिला डॉक्टरने रुग्णालयातील वॉर्डबॉयला जाब विचारला असता त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

अनिकेत डोंगरे (रा. संत कबीरनगर, भोसला स्कुलच्या मागे, नाशिक) असे महिला डॉक्टरवर हल्ला (Attack) केलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. तसेच या हल्ल्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेप्रकरणी संबधित महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) तक्रार दिली होती. त्यानंतर या तक्रारीवरुन वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक (Arrested) केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com