प्रभाग 6 : मध्यमवर्गीय ते उच्चभ्रू वस्ती समस्यांच्या विळख्यात

प्रभाग 6 : मध्यमवर्गीय ते उच्चभ्रू वस्ती समस्यांच्या विळख्यात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंचवटीतील प्रभाग क्रमांक 6 Panchavti, Ward No 6 हा उच्चभ्रू वस्ती ते गावठाण, मळे परिसर तसेच मध्यमवर्गीय समाज असा सर्वंकष सामाजिक व्यवस्थेचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. दक्षिणेकडून रामवाडी पासून सुरू झालेला हा परिसर उत्तरेकडे मखमलाबाद गाव आणि पश्चिमेकडे बापू पुलाचा अर्धा भाग ते पूर्वेकडे पेठरोड असा पसरलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेले असल्याने अंतिमतः येथील नागरिकांना तेवढ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

प्रामुख्याने सर्वात मोठी समस्या रस्त्यांची Roads आहे. प्रभागातील ठराविक रस्ते वगळता इतर रस्त्यांना कोणी वालीच नाही अशी परिस्थिती आहे. पंचवटी विभागीय कार्यालय ते मखमलाबाद गाव हा एक टप्प्याचा रस्ता अतिशय खराब आहे. या रस्त्यावर ना दुभाजक आहे ना रस्त्यावरची लाईट. तसेच मखमलाबाद येथील गंगापूर डावा कॅनॉलरोडची देखील दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. हा रस्ता म्हणजे पुढे होरायझन अकादमी ते मखमलाबाद गाव यांना जोडणारा प्रमुख रस्ता होय. या रस्त्याची दुरवस्था असल्याने सध्या तरी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या प्रभागात जागोजागी कचरा, पाण्याचा अपव्यय, अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती, रस्त्यावर येणारे सांडपाणी, अपुर्‍या संख्यांचे शौचालये व त्यातील अस्वच्छता, बंद पथदीप, अडगळीत पडलेली उद्याने अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे.

तवली येथील डोंगरावर सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेचा पैसा वापरला जात असून त्याऐवजी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात याव्या असाही सूर या प्रभागातील नागरिकांमधून पुढे येत आहे.

महापालिकेतील माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, पंचवटी सभापती हे सर्व महत्वाचे पदे भूषविलेले पदाधिकारी या प्रभागात असले तरीदेखील महापालिकेची हक्काची वाहनसेवा असलेल्या सिटीलिंकच्या मर्यादित बसेस या भागातून वाहतूक करत आहेत. त्यामुळे नोकरशहा वर्ग देखील असमाधानी आहे.

मखमलाबाद गावासह कॅालनी परिसर हा मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. नव्याने वास्तव्यास येणार्‍या नागरिकांची संख्या वाढते आहे. मात्र कॅालनी परिसरात मुख्य समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. कमी दाबाने पाणीपुरवठा, कॅालनी परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे, काही भागात कच्चे रस्ते, डासांचा प्रादुर्भाव या सारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

- वसंतराव आहेर

नाशिक शहर करोना सारख्या महामारीतून सावरत असतांना डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखे आजारांवर नाशिककर लढत देत आहे त्यात प्रभाग 6 मध्ये श्री महादेव मंदिर स्वामी विवेकानंदनगरमध्ये साचलेले पाणी दिसत आहे. यामुळे चिकणगुणीया डेंग्यूसारखे आजार पसरत आहेत.

- अमोल जाधव

‘या’ आहेत समस्या

कॉलनी परिसरातीस रस्त्यांची दुर्दशा

कमी दाबाने पाणीपुरवठा

डास वाढले

कॅालनी परिसरात बरेच पक्के रस्ते बाकी

परिसरात मोठ्या मैदानाची आवश्यकता

बंद पथदीप

वाचनालयांचा अभाव

अपघातांचे वाढते प्रमाण

मोकाट जनावरांचा त्रास

डंबरीकरणाची प्रतीक्षा

साथीच्या आजारात वाढ

गढूळ पाणीपुरवठा

स्वच्छतागृहांची दुरवस्था

वाहतूक कोंडी

Related Stories

No stories found.