प्रभाग 9 : नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण

प्रभाग 9 : नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग-9 Ward -9 धृवनगर Dhruavnagar, शिवाजीनगर Shivajinagar, श्रमिकनगर Shramik Nagar असा सुमारे 45 हजार मतदारांचा हा प्रभाग. या प्रभागात बहुतांश कष्टकरी कामगार मध्यमवर्गीय लोकांची वसाहत या प्रभागाला झोपडपट्टी लागून आलेली नसली तरी प्रभागात राहणार्‍या लोकवस्तीमध्ये बहुतांश भाग कष्टकरी वर्गाचा व्यापलेला असल्याने प्राथमिक सुविधांची वनवा मोठ्या प्रमाणात जाणवते.

औद्योगिक वसाहत जवळ असल्याने या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो आहे. धृवनगर परिसर हा नव्याने विकसित होत आहे. त्यामुळे या भागात फ्लॅट सिस्टिम विकसित झाली आहे. तर श्रमिकनगर भागात रो हाऊस प्रणाली वेगाने काम करते आहे. या प्रभागात मुलांसाठी सात शाळा उभारण्यात आलेल्या आहेत. हिंदी भाषिक वर्ग जास्त असल्याने या ठिकाणी हिंदी भाषा शाळाही उभारण्यात आलेली आहे.

या भागात प्रामुख्याने रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. परिसरातील उद्यानांची संख्या जास्त असली तरी मोजकी उद्याने ही सुस्थितीत दिसून येतात. बहुतांशी उद्यानांमध्ये गाजर गवत वाळलेली झाडे तुटलेली खेळणी जॉगिंग ट्रॅक ची दुरवस्था अशी परिस्थिती निदर्शनास येते. प्रभागातून वाहणार्‍या नैसर्गिक नाल्याचा प्रश्न गंभीर होत आहे. मोठ्या प्रमाणात या नाल्यामुळे रोगराई पसरत आहे. या नाल्याला बूजवण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यवसायिकांनी चालवल्याने दिसून येत आहे.

श्रमिक नगर व धृवनगर भागातील अनेक रस्ते मातीचे आहेत. या रस्त्यांना अद्याप डांबरही लागलेला दिसून येत नाही.रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. प्रभागातून वाहणारा नैसर्गिक नाला बांधकामाच्या अतिक्रमणाने दिवसेंदिवस बारीक होऊ लागलेला आहे. या नाल्यावर अतिक्रमण होत आहे. याबाबत नागरिकही सातत्याने तक्रार करीत आहेत.

निवासी वसाहती लगत उद्योगक्षेत्र येत असल्याने या भागातून उद्योगांच्या अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येतेे. या ठिकाणी अवजड वाहनांमुळे नागरी वाहतूकीला मोठी अडचण निर्माण होते. अनेक वेळा झालेल्या अपघातात नागरिकांना याठिकाणी प्राणही गमवावे लागल्याचे दिसून येत आहे.

मुख्य रस्त्यावर दूभाजक टाकण्यात आले असले तरी रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे. त्यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी पंक्चर देण्याची गरज असल्याने नागरीकांचे म्हणणे आहे.

अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजी नगर या भागातून वाहणारा नैसर्गिक नाला बिल्डर घश्यात घालत आहेत. प्रशासनाचे या कडे लक्ष नाही. हा नैसर्गिक नाला सरक्षित करुन वाहता करण्यात यावा.त्यावरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे

-युवराज मोरे

केला मात्र त्या रस्त्यांची स्थिती सूधरवण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाही. त्र्यंबक रोड ते गंगापूर रोड ला जोडणारा मार्ग आजही वाहतूकीला अडचणीचा होत आहे. या भागात रस्त्याच्या कडेला होणारी अवजड वाहनांची पार्कींग तातडीने रद्द करुन रस्ते मोकळे करण्यात यावे.

-अतूल पवार

रस्त्यांची दुरावस्था - गॅस पाईप लाईन साठी फोडलेल्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था गंभीर, श्रमिकनगर धृवनगरातील रस्त्यांना डांबराची प्रतिक्षा.

उद्यान दुरवस्था - प्रभागात उद्यान आहे बहुतांश उद्योनांची देखभाल नाही, ओस पडलेली खेळणी, उद्यानांमध्ये जंगली गवताचे साम्राज्य, मोकाट कूत्र्यांचा व जनावरांचा त्रास,

आरोग्याचा प्रश्न गंभीर - बहुतांश वसाहतीत अस्वच्छतेमुळे साथरोगांचा प्रादुर्भाव, धूर फवारणी अनियमित, उघड्यावरील मांस विक्री

पथदीप- अनेक भागात खांबांची व नवीन पथदिपाची प्रतीक्षा,

भाजी बाजार - प्रभागातील शिवाजीनगर परिसरात गावातील अद्यायावत भाजी बाजार असतानाही भाजी विक्रेते रस्त्यावर, औद्योगिक वसाहतीलगत मोठ्या प्रमाणात भाजी बाजार श्रमिकनगर अशोकनगरमध्ये दैनंदिन भाजीबाजाराचा प्रश्न गंभीर, हॉकर्स झोन पडले ओस, त्र्यंबकरोड गंगापूर रोड दरम्यानच्या रस्त्यावर वर्दळीच्या भागात अतिक्रमण.

वाहनांची गर्दी - उद्योगांच्या अवजड वाहनांची रस्त्यावर गर्दी.

Related Stories

No stories found.