प्रभाग 7 : उच्चभ्रू वसाहतीत प्राथमिक सुविधांची वानवा

प्रभाग 7 : उच्चभ्रू वसाहतीत प्राथमिक सुविधांची वानवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग 7 हा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर आसाराम बापू पूल Bapu Bridge ते भोसला महाविद्यालयाचा चौक, पूढे कॉलेज रोडने मॉडेल कॉलनी, Model Colony, डिसूझा कॉलनी हा परिसर पंडित कॉलनी सिग्नल पर्यंत येतो. पूढे तेथून थेट मल्हार गेट पोलिस ठाण्यापासून शनिगल्ली, हेमलता थिएटर घेत गंगाघाटापर्यंत जातो.

गंगेच्या किनार्‍याने पश्चिमेस आसाराम बापू पूला पर्यंतचा संपूर्ण परिसर प्रभाग -7 मध्ये समाविष्ट आहे. एकूण 48 हजार मतदार असलेल्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे सायंकाळी या रस्त्यांवर मोठी वर्दळ राहते. वाहनांची पार्कींग व भाजी बाजाराचे अतिक्रमण तसेच फूटपाथवर स्थिरावलेले अतिक्रमण यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालणेही कठीण होऊ लागलेले आहे.

डिसूझा कॉनीतील एकमेव उद्यानात घाणीचे साम्राच्य पसरलेले आहे. याठिकाणी बाकडे देखिल तूटलेले आहे. जॉगिंग साठीच्या फूटपाथ अनेक ठिकाणी उखडलेले आहेत. या परिसरात कोचिंग क्लासेसचे प्रमाण जास्त असल्याने या भागात विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात राहते.

उच्चभ्रू वसाहतीत प्रत्येकाकडेचारचाकी वाहन असणे प्रतिष्ठेचे नव्हे तर गरजेचे झालेले आहे. मात्र इमारतीत पार्कींगची जागा नसल्याने अनेक लोकांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क केलेल्या असतात.

आकाशवाणी टॉवर लगतचा भाजी बाजाराचा प्रश्न तर गंभीर रुप घेत आहे. पूर्वी याठिकाणी 145 भाजी विक्रेते होते. त्यांच्या मापात ओटे बांधण्यात आले होते. मात्र ओट्यांवर बसण्यास नकार देत व्यवसायिकांनी रस्त्यालगतच ठाण मांडले आहे. पूर्वीच्या 145 जणांची संख्या आता 200च्या वर गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे व्यवसायिकांचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे. अतिक्रमण विभागाच्या बोटचेपे धोरणामुळे असे प्रश्न जादा काळासाठी लटकत राहील्याचे चित्र आहे.

मुख्य बाजारपेठ व निवासी प्रकल्पांच्या पार्किंगचा प्रश्न वाहने रस्त्यांवर त्यामुळे सातत्याने वाहतूकीची कोंडी होताना दिसून येत आहे. चौकाचौकात व सिग्नलवर भिकार्‍यांचा उपद्रव वाढू लागला आहे. अस्वच्छतेचा त्रास परिसरातील रहिवाश्यांना सहन करावा लागतो.प्रभागात सार्वजनिक शौचालयांचा तूटवडा आहे. प्रसाधन गृहांची गरज आहे. प्रसाधनगृहांअभावी ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

भागात चार लोकप्रतिनिधी असतानाही भाजी बाजाराचा प्रश्न अधांतरीत राहीलेला आहे. दिग्गाजांच्यानी हा प्रश्न सूटत नाही तेव्हा या प्रश्नाची सोडवणूक कोण व कशी करणार हा प्रश्न गंभीररुप धारण करणार आहे.

- व्यंकटेश आढाव

स्त्याची दुरावस्था - स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे अशोक स्थंभ ते सरकारवाडा पोलिस ठाण्यादरम्यानच्या रस्त्याची दैना, लगतच्या कॉलनी आणि स्लम वसाहतींना नवीन रस्त्यांची प्रतीक्षा.

उद्यान दुरावस्था - डिसूझा कॉलनी , पाटील लेन, पंडित कॉलनीसह इतर प्रभागात उद्यान आहे मात्र देखभाल नाही, शोभेचे उद्यान, लहान मुलांच्या खेळणीची दुरावस्था, गवताचे साम्राज्य, मोकाट जनावरांचा वावर.

आरोग्याचा प्रश्न गंभीर - प्रभागात स्लम वसाहतीत अस्वच्छतेमुळे साथरोगांचा प्रादुर्भाव, धूर फवारणी कधीतरी.

पाणी - छोट्या वसाहतीत कमी दाबाने पाणी पुरवठा, रहिवाशी इमारतीत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी.

पथदीप - अनेक भागात नवीन पथदिपाची प्रतीक्षा,

भाजी बाजार - प्रभागातील आकाशवाणी केंद्राचा अद्यायावत भाजी बाजार ओस ठेवून भाजी विक्रेते रस्त्यावर, दैनंदिन भाजीबाजाराचा प्रश्न गंभीर, गंगापूर रोड कॉलेज रोड पंंडीत कॉलनी या वर्दळीच्या भागातील फुटपाथवर अतिक्रमण.

Related Stories

No stories found.