प्रभाग 3 : रस्ते व भाजी बाजाराची समस्या

पथदीपांचा लपंडाव, कमी दाबाने पाणीपुरवठा
प्रभाग 3 : रस्ते व भाजी बाजाराची समस्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग क्रमांक तीनमध्ये Ward No 3 पूर्ण तपोवन Tapovan , टकले नगर Takle Nagar , गणेशवाडी Ganeshwadi , जुना आडगाव नगर, हिरावाडी रोड, त्रिमूर्ती नगर, रासबिहारी रोड, त्रिकोणी बंगला, मीनाताई ठाकरे स्टेडीयम, केकेवाघ कॉलेज, नवीन आडगाव नाका स्वामी नारायण नगर हा परिसर. संपुर्ण कॉलनी परिसर असलेल्या या भागात लहान मोठे बंगलो, अपार्टमेंटस्ने सज्ज असाच आहे.

जुन्या भागात समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत, तर नव्याने विकास होणार्‍या भागात अनेक अडचणींना सामोरे जाऊन नागरीकांंना दिवस काढावे लागत आहेत. लहानग्यांसाठी इथे गार्डन आहे, पण अस्वच्छता असल्याने गार्डनमध्ये जाण्यास सक्त मनाईच आहे. महिलांसाठी योगा सभागृह आहे पण रात्री तो तळीरामांचा अड्डा झाला आहे.

तारकंपाऊंड केलेल्या तारा, लोखंडाचे पाईप, गज आणि एंगल येथील टवाळखोरांनी कधीच विकले. डोक्याएवढे मोठाली झाडे, गवत यामूळे कुणीही येथे जाण्यासाठी धजावत नाही. प्रभाग मोठा आहे, पण अंतर्गत कलहामूळे नगरसेवकांनी आपापले परिसर वाटून घेतले आहेत, त्यामूळे विकास गल्लीबोळात येऊन थांबल्याचे येथील अनेकजन बोलून दाखवतात.

त्रिमूर्ती नगर परिसर जुना आहे. याठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य काही नवीन नाही. विद्यानगर कॉलनी, रासबिहारी रोड नवीन वसाहती होत आहेत. याठिकाणी विरळ लोकवस्ती असली तरीदेखील रस्त्यांच्या अडचणी मोठ्या आहेत. अनेक कॉलण्यांमध्ये रस्ते नाहीत, खडीकरण झाले तर डांबरीकरण झालेले नाही. महामार्गाला जोडणारे रिंगरोड आहेत त्यामूळे अरुंद रस्त्यांवर अवजड वाहणांची ये-जा नियमित असते. परिणामी, अपघात वाढले आहेत.

रिंगरोडची रुंदी वाढवावी

बळी मंदीर परिसर ते मेरीपर्यंतचा रस्ता हा गुजरातहून येणार्‍या अवजड वाहनांसाठी आणि नाशिक येथील भाजीपाला मार्केटसाठी सोयीस्कर बायपास आहे. या रस्त्यावर रहदारी बेसुमार वाढली आहे. रस्त्याची रुंदी कमी आहे, त्यामूळे याठीकाणी अपघात घडतात. त्यामूळे येथील रस्त्याची रुंदी वाढविण्यात यावी. पायी चालणार्‍यांंना व सायकलस्वारांना साईड पट्टयादेखील चांगल्या नसल्याने जीव मुठीत धरुन चालावे लागते. रस्ता रुंदीकरण केले तर सर्व प्रश्न सुटतील.

- योगेश भदाणे, शिक्षक, अयोध्या नगरी 3

भाजीबाजारासाठी हक्काची जागा हवी

अमृतधाम परिसरात सोमवारी आणि रासबिहारी लिंकरोड परिसरात शनिवारी आठवडे बाजार असतो. याठिकाणी व्यावसायिकांना कुठलीही शिस्त नाही. जिथे जागा मिळेल तिथे हे व्यावसायिक विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसतात. दुसरीकडे काही महाभाग दुचाकीवर बसूनच बाजारातील वस्तु खरेदी करताना दिसून येतात. यामूळे वाहतूक कोंडी होते. तसेच याठिकाणी बाजार झाल्यानंतर व्यावसायिक घाण तशीच सोडून निघून जातात यामूळे परिसरात दुर्गंधी पसरते.

- निलेश बस्ते, अमृतधाम नाशिक

ऐकावं ते नवलंच

या प्रभागातील उद्यानांची स्थिती बिकट आहे, खेळण्या मोडल्या आहेत. मॉर्निंग वॉकसाठी धड निट जागा नाही. मात्र, येथीलच एक अलिशान असे गार्डनची सर्वत्र चर्चा आहे. इथे देखभालीसाठी पाच ते सहा कुटूंब आहेत, शौचालयांची संख्या अधिक आहे. इथे होऊ शकते तर इतर परिसरात का नाही, असा प्रश्न येथील काही सुजाण नागरीक विचारत आहेत.

या आहेत समस्या...

कमी दाबाने पाणीपुरवठा

घंटागाडीची घंटा केव्हाही वाजते

पथदीप कधी सुरु होतात माहिती नाही

अपघाताचे प्रमाण मोठे

वाचनालय नाही

ग्रंथालय नाही

सभागृह आहेत पण ही जागा तळीरामांची

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते

एलईडी लाईट कॉलनीत बंद असतात

सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

आठ शौचालय आहेत उद्यान सांभाळण्यासाठी

धूर फवारणी नाही

जागोजागी मलेरिया, चिकन गुनियाचे रुग्ण वाढले

अनेक ठिकाणचे चेंबर उघडे आहेत

पाण्याच्या गळतीकडे दुर्लक्ष

महिला योगा हॉलमध्ये दिसतात मद्याच्या बाटल्या

एकाच कॉलनीत रस्ते तर पण दुसरा रस्ता चिखल

अपघातांचा परिसर

भाजीबाजार रस्त्यावर भरतो

मुलांना खेळायला मैदान नाही

गस पाईपलाईन खोदून ठेवली

मोठी वाहतूक कोंडी होते.

अंदाजपंचे पाणीपट्टी येते

Related Stories

No stories found.