प्रभाग 29 : अतिक्रमणाची समस्या

प्रभाग 29 : अतिक्रमणाची समस्या
USER

नवीन नाशिक । प्रतिनिधी Navin Nashik

प्रभाग क्रमांक 29 (Ward No. 29) मध्ये भाजपाचे (bjp) तीन तर तर शिवसेनेच्या (shiv sena) एक नगरसेविका (Corporator) असे पक्षीय बलाबल आहे. तर हा प्रभाग म्हणजे अतिशय वर्दळीचा परिसर (Crowded area) म्हणून नवीन नाशकात (navin nashik) परिचित आहे. प्रभाग 29 ची सुरुवात पवन नगर (pavan gagar) पासून पुढच्या भागापासून उत्तम नगर (uttam nagar), शुभम पार्कच्या समोरील परिसर, डावीकडे बुद्ध विहार, विजयनगर, मोरवाडी अमरधाम परिसर,

अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Thane), सत्यम मंगल कार्यालय, व तेथून स्टेट बँक चौपाटी समोरील परिसर ते दत्त चौक मटन मार्केट परिसर, तेथून तोरणा नगर व पवन नगर भाजी मार्केटच्या अलीकडील परिसर असा व्यापकरित्या व्यापलेला आहे. या प्रभागांमध्ये मुख्यत्वेकरून अतिक्रमण (encroachment) ही फार मोठी समस्या आहे. तर अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी (Traffic jam) ही गेल्या कित्येक वर्षापासून दररोजची आहे.

आज पर्यंत मनपा प्रशासनाने वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या मात्र त्या रोखण्यात उद्यापर्यंत प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र पवन नगर भाजी मार्केट समोरील परिसरात दिसून येते.

  • उत्तम नगर ते बुद्ध विहार दरम्यान असलेल्या वावरे महाविद्यालयाच्या बाहेर महाविद्यालय सुटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते.

  • पवननगर येथील गणपती मंदिरासमोर हॉकर्सने लावलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.

  • प्रभाग क्रमांक 29 मध्ये उघड्यावरील नाला हा मोठा प्रमाणावर या प्रभागातून जात असल्याने या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असते यासाठी प्रशासनासोबत नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येते.

  • नाला उघड्यावर असल्यामुळे नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकत असल्याने यावर प्रतिबंध कसा करावा असा प्रश्न प्रशासनासमोर देखील आहे.

प्रभाग क्रमांक 29 मध्ये असलेल्या नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी येत असल्याने याठिकाणी सप्तशृंगी चौक परिसरामध्ये सतत दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते. याबाबत वारंवार मनपा प्रशासनाला नागरिकांतर्फे निवेदन देऊन देखील अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नसल्याने त्याचा मनस्ताप नाल्या लगत राहणार्‍या नागरिकांना होत आहे.

श्रद्धा पाटील

पवन नगर भाजी मार्केट समोरील परिसरामध्ये असलेल्या हॉकर्सला इतरत्र हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी तसेच उत्तमनगर ते बुद्ध विहार दरम्यान शाळा व कॉलेज सुटल्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना होणारा मनस्ताप दूर होईल.

राजु सावंत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com