प्रभाग 28 : वाहतूक कोंडी, अतिक्रमण समस्या

प्रभाग 28 : वाहतूक कोंडी, अतिक्रमण समस्या
USER

नवीन नाशिक । प्रतिनिधी Navin Nashik

प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेनेचे (shiv sena) तीन नगरसेवक (Corporator) तर भाजपच्या (bjp) एक नगरसेविका आहेत. सदर प्रभागात अंबड (ambad) गावाच्या अलीकडील परिसर, साई ग्राम परिसर, माऊली लॉन्स, परिसर, डीजीपीनगर (DGP nagar) क्र. 2, फडोळ मळा, एकदंत नगर खुटवडनगरच्या अलीकडील परिसर, शुभम पार्क जवळील परिसर, महाजन नगर असा मोठ्या प्रमाणावर व्यापलेला आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) कडे जाणारा मुख्य रस्ता हा माऊली लॉन्स मार्गे याच प्रभागातून जातो. या प्रभागांमध्ये माऊली लॉन्स प्रणय स्टॅम्पिंग दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे (Road widening) काम सध्या संथ गतीने सुरू आहे. मात्र नागरिकांचा विरोध असताना देखील सुमारे 40 ते 50 मोठी झाडे या ठिकाणी तोडण्यात आली. तसेच पावसाळ्याच्या आधीपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

माऊली लॉन्स ते डीजीपी नगरचा वळणाच्या भागापर्यंत या ठिकाणी अतिक्रमित (Encroachment) भाजी बाजार बसत असल्याने वाहतुकीची कोंडी (Traffic jam) सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर असते यामुळे वाहनचालकांना कसरत करत आपले वाहन चालवावे लागते. यासोबतच उपेंद्र नगर ते उत्तमनगर (uttam nagar) दरम्यान रस्ता छोटा असताना देखील नाही या ठिकाणी रस्ता दुभाजक (Road divider) लावल्याने अपघाताचे (aacident) प्रमाण जास्त आहे.

  • साई ग्राम परिसरातील कॉलनी रस्ते गेल्या सुमारे बारा ते तेरा वर्षापासून झाले नाहीत.

  • साईराम कॉलनीत ड्रेनेज तुंबण्याचे चे प्रमाण सततचे आहे.

  • साईराम परिसरात मनपाचे पथदीप घरालगत असल्याने यापूर्वी जमिनीत करंट उतरून अपघात देखील झाले आहेत.

  • परिसरात अनधिकृत बांधकामा बाबत नागरिकांनी तक्रार करून अद्यापही कारवाई झालेली नाही.

  • प्रभागात बर्‍याच ठिकाणी असलेल्या मोकळ्या भूखंडांवर गाजर गवताचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे.

साईग्राम परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कॉलनी रस्त्यांचे काम झालेले नाही तर रस्ते तयार करत असताना घरांच्या उंचीपेक्षा रस्त्याची उंची वरती असल्याने दर पावसाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी शिरत असते याकडे वारंवार तक्रार करून देखील मनपा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राकेश सावखेडकर

प्रभागातील मोठ्या मोकळ्या भूखंडांवर गाजर गवताचे साम्राज्य वाढल्याने या ठिकाणी सापांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात जाणवतो. तर उपेंद्र नगर ते उत्तम नगर दरम्यानचा मुख्य रस्ता अरुंद असून या ठिकाणी रस्ता दुभाजक पूर्वीच टाकल्याने भाजीबाजार लगत असलेल्या मुख्य रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. याकडे मनपा प्रशासनाने जबाबदारीने बघणे गरजेचे आहे.

दीपक आहेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com