प्रभाग 27 : अतिक्रमणाने वाहतूक कोंडी, पाणीटंचाई

प्रभाग 27 : अतिक्रमणाने वाहतूक कोंडी, पाणीटंचाई

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

प्रभाग क्रमांक 27 Ward 27 हा अश्विन नगर येथून सुरू होऊन चुंचाळे शिवार Chunchale Shivar घरकुल योजना परिसरापर्यंत व्यापला गेला आहे. तसेच अंबड औद्योगिक वसाहतीचादेखील यामध्ये समावेश होतो. अंबड औद्योगिक वसाहतीनजीक कामगार वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

परिसरात पाथर्डी फाटा येथे ठिकाणी जलकुंभालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने येथे सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. सोबतच परिसराला नव्याने तयार झालेला रस्ता दुसर्‍या दिवशी जलकुंभांची वाहिनी टाकण्याचा विसर पडल्याने तोडण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना खड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतून पाथर्डी फाटा परिसराकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगतच गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांत पूर्वी झाले. मात्र रस्त्यालगतचा परिसर म्हणून ठेवण्यात आला आहे.

पाणीटंचाईचा सामना

मळे परिसरात तीस वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. सध्या येथील लोकसंख्या ही झपाट्याने वाढली आहे. मात्र त्यानुसार वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन देखील ही जलवाहिनी न बदलल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दुर्दैव आहे.

- शरद दातीर

रस्त्यांची दुरवस्था

मळे परिसरात बर्‍याच ठिकाणच्या रस्त्यांचे साधे खडीकरणदेखील अद्यापपर्यंत झालेले नाही. तेव्हा प्रशासनाकडून डांबरीकरणाची अपेक्षा काय ठेवावी? चुंचाळे शिवारात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतदेखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

- भरत दातीर

ठळक मुद्दे :-

*मंदा दातीर मळे परिसर, सरपंच मळे परिसर, मोठी विहीर, भिकाजी दातीर मळा, रघुनाथ दातीर मळा, रामकृष्ण दातीर मळा, आदी मळे परिसरामध्ये तीस वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकली होती. अद्यापपर्यंत लोकसंख्या वाढीबरोबर ती न बदलल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या अडचणींना मोठ्या प्रमाणावर येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे.

* मळे परिसरांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था *ग्लोबल व्हिजन शाळेच्या मागील रस्त्यांची दुरवस्था

* दत्तनगर परिसरात रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण बर्‍याच ठिकाणी झालेले नाही.

* संभाजी स्टेडियम चे काम सुमारे दोन वर्षापासून संथ गतीने अद्यापपर्यंत सुरू आहे.

* संभाजी स्टेडियम मध्ये बर्‍याच ठिकाणी रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य.

* चुंचाळे घरकुल योजनेमध्ये घराच्या कामांचा निकृष्ठपणा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com