प्रभाग 26 : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

प्रभाग  26 : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

प्रभाग 26 Ward 26 मध्ये शंभुराजेनगर Shambhuraje Nagar परिसरामध्ये नाल्यालगत असलेल्या महापालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी Dirty Smell पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

प्रभाग 26 मधील शिवशक्ती चौकाकडून इंद्रनगरी परिसराकडे येताना शंभुराजेनगर या ठिकाणच्या रस्त्यावर महापालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच बांधकाम व्यावसायिक या ठिकाणी डेब्रिज आणून टाकतात. या परिसरातील आजूबाजूचे रहिवासी, हाँटेल व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार रस्त्यालगच कचरा टाकतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग साचले असल्याने या भूखंडाला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

यामुळे साथीचे आजार पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कायमस्वरुपी या ठिकाणी कचरा दिसत असल्याने काही नागरिकांकडून मेलेले जनावरे या भूखंडावर टाकले जात आहेत. त्यामुळे परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरून रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. करोनासारख्या महामारीच्या काळात स्वच्छतेची नितांत आवश्यकता असतानाही आरोग्य विभागाकडून स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सदर परिसर हा ब्लॅक स्पॉट आहे. कायस्वरुपी येथे कचरा साचून दुर्गंधी पसरलेली असते. परिसरातील नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घंटागाडीत कचरा न टाकता या ठिकाणी कचरा टाकतात. काही हॉटेल व्यावसायिकही रात्रीच्या वेळी कचरा टाकत असल्याने महापालिकेने सतर्क राहून दंडात्मक कारवाई केली पाहिजे.

- अ‍ॅड. तानाजी जायभव, माजी नगरसेवक

Adv. Tanaji Jayabhav, former corporator

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com