प्रभाग 24 : रस्ते, ग्रीन जिमची दुरवस्था

प्रभाग 24 : रस्ते, ग्रीन जिमची दुरवस्था

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

प्रभाग क्रमांक 24 Ward 24 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक तर शिवसेनेचे तीन नगरसेवक असे पक्षीय बलाबल होते, मात्र गेल्या करोनाच्या corona काळात लोकांना सेवा देत असताना या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांची जागा अद्यापही रिक्त आहे.

प्रभाग 24 मध्ये इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक व दोन, यांच्यासह लेखानगर पासून सुरु होऊन कर्मयोगी नगर, बडदे नगर, खांडे मळा, आदी मळे परिसराच्या भागासह राणाप्रताप चौक,शिवाजी चौक, शॉपिंग सेंटर, कालिका नगर, जगताप नगर त्यामागील काही भाग व नव्याने विकसित होत असलेला परिसर असा समावेश होतो.

मुख्यत्वेकरून मळे परिसरात या ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे तर बडदे नगर हून पाटील नगरच्या दिशेने जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून एक नजिकचा मार्ग तयार करण्यात आला मात्र या ठिकाणी काही थोडा भागच रस्ता पूर्ण व्हायचा बाकी असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मनपातर्फे संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतला नव्हता तर हा रस्ता बांधण्याचा अट्टाहास का असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उद्यान या ठिकाणी असलेल्या ग्रीन जिमची देखील दुरवस्था झाली आहे.

यासोबतच लहान मुलांच्या खेळण्याचे देखील नुकसान झालेले दिसून येत आहे. तसेच या ठिकाणी असलेले विजेच्या बरेचशा पेट्या ह्या उघड्या अवस्थेत असल्याने भविष्यात या ठिकाणी दुर्घटना घडली नाही म्हणजे झालं. उद्यानाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले दिसून येत आहेत सध्या मनपातर्फे फक्त ठिगळ लावण्याचे काम सुरू आहे मात्र खड्डे बुजवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा कशी कार्यान्वित करण्यात येईल याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून आहे.

बडदे नगर ते पाटील नगर हा खूप मोठा नजीकचा रस्ता मनपाने मंजूर करून आणला मात्र या ठिकाणी थोडाच परिसर बाकी ठेवण्या मागचे गौडबंगाल काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात या ठिकाणी दुचाकी चालवतांना आम्हाला खूप कसरत करावी लागली आहे.

- भास्कर पवार

परिसरातील खांडे मळा भागाच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मनपाने यासाठी चांगले नियोजन करून रस्ता पुन्हा पुन्हा डागडुजी करण्याची गरज भासणार नाही असे काम केले पाहिजे. तर मळे भाग परिसरात असलेल्या नाल्यामध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

- गणेश पाटील

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com