प्रभाग 23 : ‘नंदिनी’ प्रदूषण, गोठ्यांचा प्रश्न गंभीर

प्रभाग 23 : ‘नंदिनी’ प्रदूषण, गोठ्यांचा प्रश्न गंभीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग क्रमांक 23 Ward 23 ला महापौरपद Mayor मिळवूनही पाहिजे तसा विकास न झाल्याची खंत आहे. नंदिनी नदी Nandini River प्रदुषणमुक्त झाली नाही, तर वडाळारोड व परिसरातील म्हशींच्या गोठ्यांमधील घाण, मलमुत्र व घाण पाणी थेट मुख्य रसत्यावर येते तो प्रश्न देखील सुटलेला नाही. रस्त्यांची दुरवस्था असून समतोल विकास न झाल्याची तक्रार नागरीक करतात.

नाशिक महापालिकेची सत्ता 2017 साली पुर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या हातात आली. पहिल्या टर्मला पंचवटीला मिळालेले महापौरपद दुसर्‍या टर्मला मनपाच्या पूर्व विभागातील प्रभाग 23 चे ज्येष्ठ नगरसेवक सतिश कुलकर्णी यांना मिळाले. तर विशेष म्हणजे या प्रभागाचे चारही नगरसेवक भाजपचेच असल्याने प्रभागाचा चौफेर विकास होणार, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही न झाल्याची तक्रार आहे. मोठा प्रवास करुन येथे पोहोचणार्‍या नंदिनी नदीला अद्याप पुर्णपणे संरक्षण भिंत तयार करण्यात आलेली नाही.यामध्ये होणार्‍या घाण, कचराचे नियोजन झालेले नाही.

ड्रेनेजची समस्या कायम आहे.

रॉयल कॉलनी, खानका परिसरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आले होते. ते अद्याप बुजविण्यात आलेले नाही. यामुळे संपुर्ण परिसराची वाट लागली आहे. सर्वत्र अस्वच्छता असते, आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. वडाळारोडची अवस्था खराब झाली असून खड्डे देखील बुजविण्यात आलेले नाही. स्थानिक नगरसेवकांना तक्रारी करुनही दखल घेण्यात येत नाही.

- अहमद काझी

प्रभागाला महापौरपद मिळूनही काही विशेष उपयोग झाला नाही. अशोका मार्ग मॉडेल रोड फक्त नावाला असून संपुर्ण ठिकाणी खड्डे पडले आहे. प्रभागातील उद्यानांची अवस्था बिकट असून हिरे नगर समाज मंदिराकडे लक्ष नसल्याने दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघात वाढले आहेत. ठेकेदारवर गुन्हा दाखल व्हावा, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे.

- राजू थेटे

शहरातील इतर भागातील लोक नदीत मोठ्या प्रमाणात घाण टाकतात, मात्र मनपातर्फे त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा नाही.

बजरंगवाडी व परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.

काही भागात घंटागाडी नियमित व वेळेवर येत नसल्याची तक्रार आहे.

इंदिरानगर, साईनाथनगरकडे जाणार्‍या मुख्य रसत्याची अवस्था बिकट झाली आहे.

साहील लॉन्सच्या पुढे असलेल्या पुलावर व त्याच्या पुढे लहान-मोठे खड्डे पडले आहे.या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास होतो. तर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्यात खड्डयांमध्ये वाढ होते. तरी नियमित त्याची डागडुजी होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहे.

प्रदुषणामुळे नदीतुन दुर्गंधी परिसरात पसरते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

भारतनगर परिसरात मुलभुत सुविधांचा अभाव आहे.

वडाळारोड येथील म्हशींच्या गोठ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

गोठ्यातील घाण थेट रस्त्यावर येते, मात्र मनपाकडून अद्याप विशेष अशी काहीच कारवाई झालेली नाही.

उघडे नाले रहिवाशी भागात असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका आहे. तर दुसरीकडे संरक्षण भिंत किंवा जाळी देखील न लावण्यात आल्याने लहान मुलांना धोका आहे.

डीजीपी नगररोड व परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या भुखंडांवर कचरा जमा झालेला आहे.

पखालरोड पुलाच्या पुढे पथदीप सतत बंद असतात, यामुळे भुरट्या चोर्‍याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

बजरंगवाडी येथील सुलभ शौचालयाची दुरवस्था झाली आहे, नियमित देखभाल होत नाही.

Related Stories

No stories found.