प्रभाग 15 : वाहतूककोंडी, भुयारीमार्गाचा प्रश्न गंभीर

प्रभाग 15 : वाहतूककोंडी, भुयारीमार्गाचा प्रश्न गंभीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुंबईनाका ते थेट द्वारकापर्यंत Mumbai Naka To Dwarka विस्तारलेल्या प्रभाग 15 मध्ये Ward 15 टाकळीरोड, माणेकशानगर, बोरा कंपाऊंड, घोडेस्वार बाबा चौक, टाकळी फाटा, काठेगल्ली, मोहम्मद अली वडाळारोड, आयशा मशीद परिसर, मुंबईनाका, भाभा नगर, भगवंतनगर, पखालरोड, सातपीर बाबा चौक, नागजी परिसर आदी भाग येतो.

प्रभागात प्रामुख्याने आरोग्य, पथदिप, तसेच नंदिनी नंदी स्वच्छतासह द्वारका वाहतूक कोंडी व उपयोग नसलेल्या भुयारी मार्गाची मोठी समस्या आहे. काही भागात नियमित घंटागाडी येत नसल्याची तक्रार असून मागील तीन वर्षापासून सकाळीच पाणी पुरवठा होतो.

या प्रभागाला मनपातील बडे पदे मिळाली आहे. तरी काही भागात अद्याप विकास पोहोचला नसल्याचे जाणवते. यामुळे आता तरी सूक्ष्म नियोजन करुन विकास व्हावा, अशी मागणी होत आहे.

प्रभागातील समस्या

*या भागात शहरातील सर्वात मोठे मनपाचे दादासाहेब गायकवाड सभागृह असून त्याची व्यवस्थित निगा राहत नाही. मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तर विद्युत पुरवठा देखील कमी पडतो.

*नंदिनी नदी किनार्‍यावर शहरातील इतर भागातील घाण, कचरा लोक टाकतात, मात्र मनपाचे काहीच नियोजन नसल्याने त्याचा मोठा त्रास स्थानिकांना होतो.

*नदीलगत अनेक सोसायट्या असून त्यांना डास, मच्छरांचा मोठा त्रास कायम आहे.

*या ठिकाणी दादासाहेब गायकवाड सभागृह शेजारी भव्य जॉगिंग ट्रक होते, मात्र त्या ठिकाणी रुग्णालय तयार होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांना इतर ठिकाणी जावे लागत आहे. तर रुग्णालयाचे काम देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

*निदिनी नदीलगत साहील लॉन्सच्या पुढे संरक्षण भींत लावण्यात आलेली नाही, पाणी भरल्यानंतर थेट सोसायट्यांमध्ये पाणी शिरतो. यापूर्वी घटना घडली आहे. म्हणून पखालरोड पुलापर्यंत भींत बांधण्याची मागणी आहे.

*मागील सुमारे 25 वर्षापासून पखालरोडचे मॉडेल रोड होणार अशी चर्चा आहे, मात्र आतापर्यंत त्याकडे विशेष लक्ष देण्यात न आल्याने या संपुर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असून लहान मोठे अनेक खड्डे पडलेले आहे.

*द्वारका चौफुलीवर नियमित वाहतूक कोंडी राहते, मात्र त्यावर कायमचा तोडगा निघालेला नाही. मनपा आयुक्तांनी देखील त्याची पाहणी केली होती, तरी काहीच प्रगती झालेली नाही.

*या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले असले तरी त्याचा उपयोगच होत नाही. यामुळे तो नशेखोरांचा अड्डा बनला होता. याबाबत तक्रारी झाल्याने सध्या मार्ग बंद करण्यात आला आहे.

*येथून दुचाकीला तरी जाण्यासाठी मार्ग तयार करुन द्यावा किंवा पालिका बाजार करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नियोजनाची मागणी आहे.

*टाकळी फाटा भागात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तर गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी नशा करतांना दिसतात.

*नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका व परिसराचे सुशोभीकरण व्हावे, परीसर अतिक्रमणमुकत करण्यात यावा.

*प्रभाग 15 मध्ये अनेक ठिकाणी पथदीप बंद असतात. त्याचा फायदा घेत टवाळखोर चोर्‍या करतात.

*अनेक मोकळे भुखंड पडून असल्याने त्या ठिकाणी घाण, कचरा जमा झालेला आहे. मात्र मनपाचे सेवक ते उचलत नाही. यामुळे रोगाईला आमंत्रण मिळते.

*कॉलनी रस्त्यांची अवस्था बिकट असून खड्डे पडून त्यात पाणी साचलेले असते.

परिसरात एकही नजरेत भरेल असे विकास काम झालेले नाही. उद्यानांकडे दुर्लक्ष असून बिकट अवस्था झाली आहे. मेंटनेंस होत नसल्याने नागरिकांना त्याचा उपयोग करता येत नाही. 2007 ते 2017 या दहा वर्षाच्या काळात आदर्श प्रभाग होता. आताही लोक त्याची आठवण करतात. रस्ते, पाणी व मूलभुत सुविधांकडे लक्ष नाही. चिकुनगुनिया, डेंग्यूसारख्या आजारांना नियंत्रित करण्यासाठी उपयोजना न करण्यात आल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.

- सचिन मराठे

Related Stories

No stories found.